Israel Hamas War  Sarkarnama
देश

Israel-Hamas War : इस्राईल-हमास युद्ध संपुष्टात येणार? तब्बल सहा वर्षांनी शी जिनपिंग अमेरिका दौऱ्यावर...

Israel Hamas War : युरोपमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न...

Chetan Zadpe

Israel Hamas War : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तब्बल 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. सीएनएन या माध्यम संस्थेच्या दाव्यानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन बुधवारी सॅन फ्रान्सिस्को शहरात शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. इस्राईल-हमास आणि युक्रेन-रशिया अशी दोन मोठी युद्धे सुरू असताना आणि या मुद्द्यावरून जगाची चिंता वाढलेली असताना शी जिनपिंग यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा होत आहे. जगातल्या दोन महासत्तांची ही बैठक पश्चिम आशिया आणि युरोपमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न असा विश्वास आहे. (Latest Marathi News)

चीनवर आर्थिक संकट -

कोविडनंतर चीनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. चीनची अर्थव्यवस्था अद्याप सावरलेले नाही. चीन आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी अनेक तडजोडी करत आहेत. अशा वेळी शी जिनपिंग यांना अमेरिकेशी संबंध मवाळ करण्याची आशा आहे. याशिवाय चीनचे रिअल इस्टेट मार्केट संकटात आहे आणि तरुणांची बेरोजगारी विक्रमी पातळीवर आहे.

चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने वृत्त दिले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चीन-अमेरिका शिखर परिषद आणि 30 व्या APEC मध्ये नेत्यांच्या आर्थिक मुद्द्यांवर बैठकीसाठी सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत जागतिक पातळीवरील अशांततेच्या क्षणी दोन्ही नेते परस्पर संबंधातील तणाव कमी करू शकतील का, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या चर्चेमुळे दोन जागतिक प्रतिस्पर्ध्यांमधील द्विपक्षीय संबंध मवाळ होण्याची शक्यता कमी आहे.

अशी स्थिती असूनही दोन्ही देशांनी परस्पर चर्चेला सहमती दर्शवली असून, दोन बड्या नेत्यांची बैठक होत आहे. व्हाइट हाऊसकडून याला सकारात्मक पाऊल म्हटले आहे. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, मध्य पूर्वेमध्ये संघर्ष सुरू असताना आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना, जो बायडेन आता यापुढे युद्ध आणि युद्धसदृश जागतिक संकट उद्भवू नये यासाठी प्रयत्नशील आहेत.

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे?

दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन्ही देशांमधील लष्करी आणि सामरिक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्नुसार जो बायडेन या मुद्द्यावर जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याचा विचार करत आहेत. याव्यतिरिक्त, दोन नेत्यांमधील सहकार्याच्या क्षेत्रांमध्ये इस्राईल आणि युक्रेनमधील संघर्ष, हवामान बदल आणि अमली पदार्थांची तस्करी, मानवी हक्कांच्या इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT