Jairam Ramesh Sarkarnama
देश

Jairam Ramesh : राहुल गांधींच्या चौकशीवरुन जयराम रमेश पोलिसांवर भडकले..

Jairam Ramesh slams delhi police over visit to rahul gandhis residence : दोन तासांच्या चौकशीत पोलिसांच्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरं दिली.

सरकारनामा ब्युरो

Jairam Ramesh slams delhi police over visit to rahul gandhis residence : केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी हे भाजपच्या रडारवर आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन भाजपचे नेते संतापले आहेत.

राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच राहुल गांधी याच्या अडचणीत वाढ होत आहेत. आज (रविवारी) राहुल गांधीं यांच्या दिल्लीतील घरावर दिल्ली पोलिसांच्या पथकाने धडक दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे नेते, राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी या प्रकरणावरुन दिल्ली पोलिसांना चांगलेच सुनावले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. 'चुकीच्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर ४५ दिवसांनी दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईला काँग्रेसचे विधी सल्लागार उत्तर देतील,"

श्रीनगरमधील सभेत भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) बलात्कार पीडितांवरील वक्तव्यावरुन आज दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी केली.

राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन ही चौकशी केली. विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुड्डा (Sagar Preet Hooda) यांना राहुल गांधी भेटले. सुमारे दोन तासांच्या चौकशीत पोलिसांच्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरं दिली.

भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांना अनेक लोक भेटले, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले, सर्व माहिती जोडायला वेळ लागेल असे राहुल गांधी यांनी सांगितल्याचे हुड्डा यांनी सांगितले. तसेच आवश्यकता असल्यास पुन्हा राहुल गांधीची चौकशी करणार असल्याचे देखील हुड्डा यांनी सांगितले.

काय म्हणाले होते राहुल गांधी..

30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये राहुल गांधी यांनी एक विधान केले होते. भेटीदरम्यान ते अनेक महिलांना भेटले आणि त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर अशा पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना माहिती गोळा करण्यासाठी आपण इथे आलो आहोत..पोलिसांनी 15 मार्चला या प्रकरणाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला पण 'अपयश' आले त्यानंतर आम्ही त्यांना 16 मार्चला नोटीस पाठवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT