Sanjay Kadam : मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ही शेवटची सभा असेल..

Sanjay Kadam Attacks on CM Eknath Shinde : आता केवळ रामदास कदम नावाचा बाल्या शिल्लक आहे.
CM Eknath Shinde, Sanjay Kadam
CM Eknath Shinde, Sanjay Kadam Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Kadam Attacks on CM Eknath Shinde Ramdas Kadam Ratnagiri : काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये गोळीबार मैदानावर सभा होत आहे. सभेपूर्वीच शिंदे गट-ठाकरे गटातील नेत्यांची जुंपली आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करीत आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या या सभेची ठाकरे गटाने खिल्ली उडवली आहे. तर शिंदे गटाने ही सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याचा दावा केला आहे.

खेडमधील माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या या सभेची, तसेच या सभेच्या जबाबदारी असलेल्या शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांची खिल्ली उडवली आहे. संजय कदम एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यांनी आमदार योगेश कदम यांच्यावरही जहरी टीका केली आहे.

CM Eknath Shinde, Sanjay Kadam
Shiv Sena News : मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच केसरकरांनी ठाकरेंना डिवचलं ; ठाकरेंना लहानपणापासून खोक्यांशी खेळण्याची..

रामदास कदम नावाचा बाल्या शिल्लक..

संजय कदम म्हणाले, "मुख्यमंत्री शिंदे यांनी या सभेसाठी पैसे देऊन माणसं आणली आहेत. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची ही शेवटची सभा असेल, खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे, असे लोक म्हणतात. मात्र, आता केवळ रामदास कदम नावाचा बाल्या शिल्लक आहे. किल्ला कधीच हातातून निसटला आहे,"

CM Eknath Shinde, Sanjay Kadam
MPSC विद्यार्थ्यांनी यासाठी मानले शरद पवारांचे आभार..

मतदारसंघातील कोण, बाहेरचे कोण हे ओळखू येत नसेल..

रामदास कदम यांचे सख्खे भाऊ, त्यांचे पुतणे, त्यांच्या गावातील सरपंच आणि शाखाप्रमुख हे खेडच्या उद्धव ठाकरेंच्या सभेला होते. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांना मतदारसंघातील कोण, बाहेरचे कोण हे ओळखू येत नसेल असा टोला संजय कदम यांनी लगावला आहे.

"गेली अनेक वर्षे त्यांच्या पाठिमागे शिवसैनिक होते म्हणून त्यांना आमदारकी मिळाली आहे. आता उद्धव ठाकरेंची माणसे नकोत तर त्यांच्या पाठिशी कोण आहे," असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

CM Eknath Shinde, Sanjay Kadam
Pune News : शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही..; वळसे पाटलांनी स्पष्ट सांगितलं..

त्याला खेडमधलं काय माहिती?

"आमदार योगेश कदम कधी गावचा सरपंच झालेला नाही, पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य झालेला नाही. योगेश कदम यांच्या पाठिशी चार वर्षं बाप आहे. त्याला खेडमधलं काय माहिती आहे? मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायच समिती, सरपंच ते आमदार झालो आहे”, असा टोला संजय कदमांनी यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com