Jammu And Kashmir Sarkarnama
देश

Jammu And Kashmir Elections : दुसऱ्या टप्प्यातील 239 उमेदवारांचे 25.78 लाख मतदार भविष्य ठरवणार

Assembly Elections Voting In Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

Pradeep Pendhare

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्प्यात आज सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली.

या दुसऱ्या टप्प्यात 25.78 लाख मतदार मतदान करणार आहे. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 61.38% मतदान झाले. किश्तवाडमध्ये सर्वाधिक 80.20% आणि पुलवामामध्ये सर्वात कमी 46.99% मतदान झाले.

दुसऱ्या टप्प्यातील 26 जांगापैकी 15 जागा मध्य-काश्मीरमधील आणि 11 जागा जम्मूमधील आहेत. मतदारांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 239 उमेदवार निवडणुकीच्या (Election) रिंगणात आहे. यामध्ये 233 पुरूष आणि सहा महिला उमेदवार आहेत.

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार (Jammu And Kashmir) दुसऱ्या टप्प्यातील 131 उमेदवार लक्षाधीश आहेत. 49 जणांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. विविध आंदोलनांमध्ये सहभाग, प्रतिबंध आदेशाच्या उल्लंघनाचे गुन्हे या उमेदवारांवर दाखल आहेत.

भाजपच्या उमेदवाराची संपत्ती 1000 रुपये

जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांनी आपली संपत्ती 1000 रुपये असल्याचे जाहीर केले आहे. पीडीपी, एनसी आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा टोला रविंदर रैना यांनी लगावला आहे.

ओमर अब्दुल्ला दोन मतदारसंघात उभे

माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला दोन मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत. गांदरबल आणि बिरवाहमधून निवडणूक लढवत आहेत. तिहार तुरुंगातून निवडणूक लढवलेल्या अभियंता रशीद यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत उमर बारामुल्लाची जागा गमावली होती. यावेळीही तुरुंगात बंद असलेले सर्जन अहमद वागे उर्फ ​​आझादीचाचा हे गांदरबल मतदारसंघात त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT