Rahul Gandhi : नरेंद्र मोदी पूर्वीसारखे राहिले नाहीत, ते..! राहुल गांधी असं का म्हणाले?

Narendra Modi Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वच पक्षांतील नेत्यांकडून विरोधकांवर शरसंधान साधले जात आहे. काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

पुंछमधील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी दावा केला की, 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान मोदी जे तुम्ही पाहिले होते, तसे ते आता राहिले नाहीत. त्यांना आम्ही मानसिकदृष्ट्या तोडले आहे. मी संसदेत त्यांच्या समोर उभार राहतो. त्यामुळे मला हे स्पष्टपणे दिसत आहे. आज विरोधकांना जे करून घ्यायचे आहे, ते आम्ही करतो.

Rahul Gandhi, Narendra Modi
Secularism : राज्यपाल म्हणतात, धर्मनिरपेक्षतेची भारतात गरज नाही! विरोधक संंतापले

सरकार कायदा आणते, आम्ही त्याविरोधात उभे राहतो. ते कायदा पास करू शकत नाही. नवीन कायदा आणतात. जो आत्मविश्वास होता तो आता संपला आहे, अशी टीका राहुल यांनी केली. सरकारने मागील अधिवेशनात आणलेले वक्फ बोर्ड सुधारित विधेयक विरोधामुळे संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे लागले आहे.   

नायब राज्यपालांवर टीका करताना राहुल म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील लोक आमदारांची निवड करत आपले निर्णय घेत होते. पण आता एक राजा निवडण्यात आला आहे. राज्यपाल (एलजी) एक राजाप्रमाणे आहेत. ते बाहेरचे व्यक्ती आहेत. त्यामुळे ते काश्मिरच्या लोकांच्या मनातील काम करू शकत नाहीत.

Rahul Gandhi, Narendra Modi
Kangana Ranaut : काँग्रेसकडून कंगना रनौतला 'ओपन चॅलेंज'; सोनिया गांधींवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार

माझी गरज असेल तेव्हा मला आदेश द्या, मी येथे नक्की येईन, असे आवाहन करत राहुल गांधी म्हणाले, जम्मू-काश्मीरशी माझे राजकीय नाते नाही. तुमच्याशी माझे रक्ताचे, प्रेमाचे नाते आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे आहेत. काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ, असे आश्वासन राहुल यांनी सभेत बोलताना दिले.

नरेंद्र मोदी मोठी-मोठी भाषणे देतात, पण कामाचे बोलत नाहीत. बेरोजगारी, महागाई, युवकांचे व्हिजन, काश्मीरला राज्याचा दर्जा यावर ते बोलत नाहीत. ते फक्त मन की बात करतात. ते ऐकण्याची कुणाचीही इच्छा नसते, असा टोला राहुल यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com