Jamshedpur accident. Sarkarnama
देश

Minister daughter dies : भीषण अपघातात कॅबिनेट मंत्र्यांच्या लेकीसह चार विद्यार्थ्यांचा मृत्यू; झारखंडमधील घटनेत कारचा चक्काचूर

Deepika Pandey Singh daughter, Jamshedpur car truck collision, Minister daughter dies : वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला.

Rajanand More

Jharkhand road accident : झारखंडमधील जमशेदपूरमधील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कॅबिनेट मंत्र्यांच्या लेकीचा मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. मंत्र्यांच्या लेकीसह कारमधील अन्य तिघांचाही या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील महगामा मतदारसंघाच्या आमदार व ग्रामीण विकास मंत्री दीपिका पांडे यांची लेक तृषा सिंह हिच्यासह आणखी एक तरूणी आणि दोन तरूण कारमधून प्रवास करत होते. जमशेदपूरमधील सोनारी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोमुहानी मरीन ड्राइव परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा अपघात झाला.

वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कटर कारचे छत कापून चौघांना बाहेर काढण्यात आले. घटनास्थळीच चौघांचाही मृत्यू झाला होता. तृषा सिंह सह सार्थक अग्रवाल, नमन गुप्ता आणि वंशिका खंडेलवाल अशी मृतांची नावे आहेत. ते चौघेही जमशेदपूरमधील झेविअर स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक हायवेवर उजव्या बाजूला दुभाजकालगत उभा करण्यात आला होता. ट्रक बंद असल्याचे दर्शविण्यासाठी मागील बाजूला एका झाडाची फांदी लटकविण्यात आली होती. मात्र, मागील बाजूला रिफ्लेक्टर कुठेही नव्हते. त्यामुळे कारचालकाला ट्रक उभा असल्याचा अंदाज न आल्याने मागून जोरदार धडक दिली.

दरम्यान, अपघातानंतर राज्यपाल संतोष कुमार गंगवार, मुख्यमंत्री हेमंत सोरेने यांच्यासह मंत्रिमंडळाती मंत्री, आमदार, विरोधी पक्षातील नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आपले मुल गमाविण्याचे दु:ख आईसाठी किती मोठे असते, हे शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असे राज्यपालांनी म्हटले आहे. तर सोरेन यांनी म्हटले आहे की, पालक आणि कुटुंबियांसाठी आपल्या मुलाला गमाविण्याचे दु:ख कधीही भरून न येणारे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT