Congress MLA resignation : काँग्रेस आमदाराचा तडकाफडकी राजीनामा; मतदारसंघ दुष्काळाने होरपळल्याचे सांगत पाटलांनी आमदारकी लावली पणाला

Karnataka drought, Yashwanthrayagowda Patil, Indi MLA resignation : तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा, अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांकडे केली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Yashwanthrayagowda Patil, Indi MLA resignation
Yashwanthrayagowda Patil, Indi MLA resignationSarkarnama
Published on
Updated on

Drought latest News : महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक राज्यामध्ये दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अनेक तालुक्यांतील शेतकरी हवालदिल झाले असून सरकारकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, आपला मतदारसंघ असलेल्या तालुक्यावर अन्याय होत असल्याचे कारण देत एका आमदाराने पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकातील काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा पाटील यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि विधानसभा अध्यक्ष जी. एस. पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. पाटील हे विजयपुरा जिल्ह्यातील इंडि मतदारसंघाचे आमदार आहे. या तालुक्यासह चडाचण्णा तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश न केल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिवकुमार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचेही वृत्त आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांकडूनही अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राजीनामा पत्रात पाटील यांनी म्हटले आहे की, इंडि तालुक्यामध्ये मोठा दुष्काळ पडला आहे. पीकं हातातून गेली असून पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहिले आहे.

Yashwanthrayagowda Patil, Indi MLA resignation
BJP Political news : देशातील आणखी एक पक्ष फुटला; मित्रपक्षाचेच आठ आमदार भाजपच्या गळाला, रात्रीत फिरली चक्रं

सुरूवातीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खते घेतली. पेरण्या केल्या. पण नंतर पाऊस न पडल्याने पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इंडि तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा, अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांकडे केली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

गदग मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार एच. के. पाटील यांनीही दुष्काळाच्या मुद्द्यावर राजीनाम्याचा इशारा दिला आहे. गदग तालुक्याचा १० ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ यादीत न केल्यास राजीनामा देऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे. अद्याप हा मतदारसंघही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नाही. त्यामुळे पुढील काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

Yashwanthrayagowda Patil, Indi MLA resignation
CEC appointment law : निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल; एका न्यायमूर्तींनी घेतला आक्षेप

पाटील यांनी मागील काही दिवसांत दुसऱ्यांदा आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्याने त्यांनी ऑगस्ट महिन्यात सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com