Sanjay Raut, Jaya Kishori Sarkarnama
देश

Sanjay Raut News : सुनो… कान खोलकर सुनो! राऊतांनी गंगेतील डुबकीबाबतचा जया किशोरी यांचा Video केला शेअर...

Prayagraj Mahakumbh 2025 Jaya kishori Viral Video : महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी गंगा नदीत स्नान केले आहे.

Rajanand More

Maharashtra News : महाकुंभ मेळ्यादरम्यान नदीत डुबकी लगावण्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला. आता पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी डुबकीवरून अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

राऊतांनी एक्सवर अध्यात्मिक वक्त्या व तरुण प्रवचनकार जया किशोरी यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी गंगा नदीत डुबकी लगावण्यावरून काही विधाने केली आहेत. राऊतांनी हा व्हिडीओ पोस्ट करत अप्रत्यक्षपणे योगी सरकार व मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. राऊतांनी केवळ ‘ऐका, कान देऊन ऐका’, असे व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे.  

काय म्हणाल्या जया किशोरी?

जया किशोरी यांनी एक न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत डुबकीबाबत विधान केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांनी म्हटले आहे की, कुंभमध्ये कोण डुबकी घेत आणि कोण नाही, हे मला माहिती नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डुबकी लगावल्याने तुमचे पाप धुतले जात नाही. जी पापे चुकून झालेली असतात, तीच धुतली जातात. जाणीवपूर्वक केलेली धुतली जात नाहीत. विचारपूर्वक त्रास देत असाल तर ते पाप गंगामैय्याही धुवणार नाही. त्या पापाची शिक्षा मिळणारच’, असे जया किशोरी म्हणाल्या आहेत.

योगी सरकारकडून महाकुंभ मेळ्यात आलेल्या भाविकांच्या संख्येबाबत दररोज नवा आकडा सांगितला जात आहे. आतापर्यंत 50 कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाल्याच दावा केला जात आहे. तर दुसरीकडे महाकुंभमधील चेंगराचेंगरीवरून विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. आयोजनावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे राऊतांनी या व्हिडीओच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आतापर्यंत महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी डुबकी लगावली आहे. त्यामध्ये काही काँग्रेस नेत्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे उद्योग, सांस्कृतिक, कला अशा विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींनीही गंगेत स्नान केले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT