Tariq Anwar News : तारिक अन्वर बंडाच्या पवित्र्यात; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला झटका

Bihar Political News Congress Politics Bihar Assembly Election : तारिक अन्वर हे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असून राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
Tariq Anwar, Rahul Gandhi
Tariq Anwar, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : हरियाणा आणि महाराष्ट्रात दारुण पराभवानंतर दिल्लीतील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत झाले. पक्षाला एकही जागा मिळाली नाही. आता बिहार निवडणुकीच्या तोंडावरही पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. पक्षाचे खासदार व ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी थेट पक्ष संघटनेवर हल्ला चढवत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आले आहे. तारिक अन्वर बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. त्यासाठी काँग्रेसनेही तयारी सुरू केली असून नुकतेच बिहारचे प्रभारी बदलण्यात आले आहेत. त्यातच कटिहार मतदारसंघाचे खासदार असलेल्या तारिक अन्वर यांनी आपली नाराजी मांडताना पक्षश्रेष्ठींवरच निशाणा साधला आहे. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Tariq Anwar, Rahul Gandhi
BJP Politics : जे काम केजरीवालांना जमलं नाही, ते भाजपची सत्ता येताच 8 दिवसांतच सुरू...

अन्वर यांनी रविवारी रात्री एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना सूचक इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दखल तर घेतली, पण त्यांनी अधिक कडक निर्णय घेण्याची गरज आहे, असे अन्वर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. बिहार काँग्रेसच्या प्रभारी बदलावरून ही पोस्ट असल्याची चर्चा आहे. त्यांनी या पोस्टमध्ये काहीही स्पष्ट केलेले नाही.

अन्वर यांनी यापूर्वीही एक पोस्ट चर्चेत आली होती. निवडणुकी त्यांच्या भूमिकेत अचानक आक्रमकता आली आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. अन्वर यांनी 10 फेब्रुवारीलाही एक पोस्ट करत म्हटले होते की, काँग्रेसला आपली राजकीय रणनीती स्पष्ट करण्याची गरज आहे. आघाडीचे राजकारण करणार की एकटेच लढणार, हे ठरवायला हवे. त्याचप्रमाणे पक्षसंघटनेत मुलभूत परिवर्तन करणेही खूप गरजेचे आहे.

Tariq Anwar, Rahul Gandhi
Mayawati Big Decision: मायावतींचा मोठा निर्णय; बसपाचा उत्तराधिकारी कोण? आकाश आनंद यांना अल्टिमेटम

तारिक अन्वर यांची ही भूमिका पक्षाचे टेन्शन वाढवणारी ठरली आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी आहे. पण अद्यापही निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी एकत्रित तयारी सुरू झालेली दिसत नाही. राज्यातील पक्षाच्या प्रभारीवरून वाद होता. काँग्रेसने नुकतेच मोहन प्रकाश यांना हटवून कृष्णा अल्लावरू यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. पण त्यावरून अन्वर नाराज असल्याचे त्यांच्या पोस्टवरून दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com