Sam Pitroda News : राहुल गांधींच्या राजकीय गुरूंनी पुन्हा काँग्रेसला पाडलं तोंडावर; चीनबाबत हे काय बोलून गेले?

Congress Politics Rahul Gandhi India China relation : सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेस यापूर्वीही अडचणीत आली आहे.
Rahul Gandhi, Sam Pitroda
Rahul Gandhi, Sam PitrodaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी चीनबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेसची कोंडी झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेल्या पित्रोदा यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसला तोंडघशी पडावे लागले आहे. आताही त्यांनी चीनपासून असलेल्या धोक्याबाबत वाढवून-चढवून सांगितले जाते, असे विधान करत पक्षाला तोंडावर पाडले आहे.

काँग्रेसकडून सातत्याने चीनकडून असलेल्या धोक्याबाबत मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. मग तो जमीन बळकावण्याबाबत असो की सैन्याच्या घुसखोरीबाबत. पण पित्रोदा यांनी अगदी काँग्रेसच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका मांडल्याने पक्षाची कोंडी झाली आहे. ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पित्रोदा यांनी चीनबाबत आपले म्हणणे मांडले आहे.

Rahul Gandhi, Sam Pitroda
Tariq Anwar News : तारिक अन्वर बंडाच्या पवित्र्यात; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला झटका

पित्रोदा यांनी म्हटले आहे की, भारताला आता आपली मानसिकता बदलायला हवी. चीन आपला शत्रू आहे, ही धारणा आता सोडायला हवी. भारताची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे, ज्यामुळे शत्रुत्व निर्माण होते. चीनपासून काय धोका आहे, हे मला माहिती नाही. पण हा मुद्दा सातत्याने वाढवून-चढवून मांडला जातो. आता सर्व देशांनी एकत्र येण्याची वेळ आहे. कमांड आणि कंट्रोलच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे.

भाजपचा पलटवार

पित्रोदा यांच्या या विधानानंतर भाजपने पलटवार केला आहे. पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पित्रोदा यांचे हे विधान म्हणजे गलवानमधील शहिदांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत पुढे जात आहे. पण काही शक्ती त्यात अडथळे आणत आहेत. पित्रोदा यांचे विधान म्हणजे काँग्रेसचा चीनसोबत असलेल्या कराराची कबुली ते दिवसाढवळ्या देत आहेत, अशी टीका त्रिवेदी यांनी केली.

Rahul Gandhi, Sam Pitroda
BJP Politics : जे काम केजरीवालांना जमलं नाही, ते भाजपची सत्ता येताच 8 दिवसांतच सुरू...

काँग्रेसने हात झटकले

काँग्रेसने पित्रोदा यांच्या भूमिकेवरून हात झटकले आहेत. पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, पित्रोदी यांनी चीनविषयी मांडलेली भूमिका काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही. काँग्रेसने सातत्याने मोदी सरकारविषयीच्या चीनबाबतच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com