Newly released photos from Jeffrey Epstein’s estate show prominent global figures, including Bill Gates, highlighting Epstein’s controversial links with influential personalities. Sarkarnama
देश

Epstein Files : पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलेल्या एपस्टीन फाईल्समधील 68 फोटो आले समोर : दिग्गज नेत्यांची झोप उडाली, मुलींसोबतचे फोटो अन् चॅट्स...

New Photos of Jeffrey Epstein Files : अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील डेमोक्रॅट्सनी दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधून 68 नवीन फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अब्जाधीश उद्योगपती बिल गेटस् यांचे काही मुलींसोबतचे फोटो समोर आले आहेत.

Jagdish Patil

Jeffrey Epstein Files : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर जेफ्री एपस्टीन फाईल्स चांगलीच चर्चेत आली आहे. तर 19 डिसेंबरला अमेरकेच्या संसदेत खुल्या होणाऱ्या या फाईल्समधून जगाला हादरवणारी माहिती समोर येईल आणि याचा थेट परिणाम भारताच्या पंतप्रधानपदावर होईल, असंही चव्हाण यांनी म्हटलं होतं.

अशातच आता अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील डेमोक्रॅट्सनी दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधून 68 नवीन फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अब्जाधीश उद्योगपती बिल गेटस् यांचे काही मुलींसोबतचे फोटो समोर आले आहेत.

बिल गेट्स यांच्यासह गुगलचे सर्गेई ब्रिन, नोम चॉम्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचेही फोटो समोर आले आहेत. हे 68 नवीन फोटो गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. हे फोटो प्रसिद्ध करण्याचा उद्देश एपस्टीनचे प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करण्याचा आहे.

तर लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूपूर्वी हाऊस ओव्हरसाईट कमिटीने जप्त केलेल्या तब्बल 95,000 फोटोंपैकी हे 68 फोटो आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये अनेक देशांचे पासपोर्ट आणि ओळखपत्रांचा समावेश आहे, ज्यामध्ये वैयक्तिक माहिती लपवण्यात आली आहे.

युक्रेन आणि रशियासारख्या देशांच्या पासपोर्टसह अनेक कागदपत्रांवर 'महिला' असे चिन्हांकित केलेले आहे, आणि ओळख लपवण्यासाठी फोटोंमधील अनेक चेहरे ब्लर करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या फोटोंमध्ये एका अज्ञात व्यक्तीच्या मेसेच चॅटचे स्क्रीनशॉट प्रसिद्ध करण्यात आलेत. या मेसेजमध्ये मुलींची भरती करण्याबाबतचं बोलणं सुरू आहे.

या मेसेजमध्ये लिहिलंय की, 'माझी एक मैत्रीण स्काउट आहे, आणि तिने आज माझ्याकडे काही मुलींना पाठवले आहे. पण ती प्रत्येक मुलीसाठी 1000 डॉलर्स मागत आहे. मी आता त्या मुलींना तुमच्याकडे पाठवते. कदाचित त्यांच्यापैकी एखादी 'जे'साठी योग्य ठरेल?' या चॅटमुळे आता जगभरात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या फोटोंमध्ये काही अत्यंत धक्कादायक फोटो देखील आहेत. काही फोटोंमध्ये व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या लोलिता' कादंबरीतील काही वाक्य विविध महिलेच्या शरीराच्या विविध भागांवर लिहिलेले आहेत. एका फोटोत छातीवर तर आणखी एका फोटोत महिलेच्या पायावर काही ओळी लिहिल्याचं दिसत आहे.

दरम्यान, हे फोटो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्याय विभागाला शुक्रवारपर्यंत एपस्टीन आणि घिसलेन मॅक्सवेलशी संबंधित फाइल उघड करण्याचे निर्देश देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

याआधी प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांचा समावेश आहे. तर आज 19 तारीख असल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे आणखी काही फोटो समोर येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT