Ravindra Dhangekar: महायुतीच्या बैठकीत धंगेकरांना नो एन्ट्री! शिवतरेंनी स्पष्टच सांगितलं

Ravindra Dhangekar: महापालिका निवडणुकीची घोषणा होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsarkarnama
Published on
Updated on

Pune News: महापालिका निवडणुकीची घोषणा होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आज पहिल्यांदाच पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पुण्यामध्ये संपन्न झाली. पण या बैठकीला महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांना हजर राहण्यास मज्जाव करण्यात आला. या मागचं कारण शिवसेनेचे वरिष्ठ नेते विजय शिवतरे यांनी सांगितलं आहे.

Ravindra Dhangekar
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्विकारला; लवकरच मोठी घडामोड घडणार!

या बैठकीपूर्वी शिंदे सेनेकडून भाजपसोबत युतीसाठी 31 जागांचा प्रस्ताव दिला असल्याचा सांगितलं जात आहे. मात्र, यामध्ये काटछाट होऊन भाजप शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा देणं सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या जागांची वाटाघाटी करण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री आणि आमदार विजय शिवतारे, पुण्यातील शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि अजय भोसले हे उपस्थित होते. तर दुसरीकडे भाजपकडून खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माझी सभागृह नेते गणेश बिडकर यांची उपस्थित होती. ही पहिलीच बैठक असली तरी या पहिल्याच बैठकीत बऱ्याचशा गोष्टी निश्चित झाल्या असल्याचे सांगितले जात आहे.

Ravindra Dhangekar
Sangli Election: महायुतीच्या समन्वयाचं आव्हान! पालकमंत्री, आमदारांचा सांगलीत लागणार कस

महापालिका निवडणुकीसाठी इतकी महत्त्वाच्या असलेल्या या बैठकीला शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह शहरप्रमुख देखील उपस्थित असताना पक्षाचे महानगर प्रमुख असलेले रवींद्र धंगेकर मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. बैठकीपूर्वी रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात व्यस्त होते. यावेळी बैठकीला उपस्थित असलेले इतर नेते देखील त्या ठिकाणी होते. मात्र, या मुलाखती संपून इतर नेते महायुतीच्या बैठकीला आले. धंगेकरांना मात्र या बैठकीला बोलवण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे.

Ravindra Dhangekar
Mumbai BJP: 'धनुष्यबाण' आणि 'कमळ' हे दोन्ही एकच! खळबळजनक विधानामागे अमित साटमांचा हेतू काय?

गेल्या काही काळापासून धंगेकरांनी महायुतीत असून देखील मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. तसेच गणेश बिडकर आणि धंगेकर यांचं फार पूर्वीच राजकीय वैर आहे आणि आता हेच तीन नेते पुणे महापालिका निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अग्रभागी आहेत. त्यामुळे याच नेत्यांनी धंगेकर यांच्यासोबत महायुतीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी करण्यास नकार दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी धंगेकर यांना दूर ठेवूनच महायुतीची वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Ravindra Dhangekar
BMC Election : "नवाब मलिकांच्या पक्षाशी आमचा कुठलाही संबंध नाही"; भाजपचा एक घाव दोन तुकडे

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, "भाजप आणि शिवसेनेची आज ही प्राथमिक बैठकी झाली. बैठकीमध्ये बऱ्याचशा गोष्टी निश्चित झाल्या असून दोन्ही पक्षांमध्ये कुठलेही वाद राहणार नाहीत हे निश्चित करण्यात आला आहे. तसेच जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील लवकरच निश्चित करून तो सांगण्यात येणार आहे. पक्षासाठी अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची आमची भूमिका असल्याचं शिवतरे म्हणाले. यावेळी रवींद्र धंगकर यांना या बैठकील का बोलावण्यात आलं नाही? असं विचारलं असता काही गोष्टी टाळाव्या लागतात. समंजसपणे विचाराने काही भूमिका घ्याव्या लागतात असं सांगत रवींद्र धंगेकर यांच्या न येण्यावर शिवतरे यांनी स्पष्टीकरण दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com