Hemant Soren, BJP Sarkarnama
देश

Hemant Soren : हेमंत सोरेन यांचा अर्ज बाद करण्याचे होते षडयंत्र! प्रस्तावकाचा भाजपमध्ये प्रवेश

Jharkhand Assembly Election JMM BJP Mandal Murmu : हेमंत सोरेन यांनी बरहेट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Rajanand More

Ranchi : झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून सही असलेल्या नेत्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सोरेन यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचे षडयंत्र भाजपने रचले होते, असे आरोप सोरेन यांच्या पक्षाकडून केले जात आहेत.

मंडल मुर्मू यांची सोरेन यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून सही आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे सोरेन यांची उमेदवारी शाबूत राहिल्याची चर्चा आहे.

यानंतर झारखंड मुक्त मोर्चाचे नेते मनोज पांडे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. हेमंत सोरेन यांची उमेदवारीच रद्द करण्याचे भाजपचे षडयंत्र होते. आम्ही ते षडयंत्र उधळून लावले, असे पांडे यांनी म्हटले आहे. त्यांनी सुरत लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी घडलेल्या प्रकाराचा संदभर् देत भाजपला टार्गेट केले.

सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावर सही केलेल्या प्रस्तावकाने नंतर पत्र लिहून आपली सही नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितल्याने अर्ज बाद ठऱवण्यात आला होता. त्यानंतर इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध पार पडली होती. तसाच प्रकार बरहेटमध्ये करण्याचे षडयंत्र होते, असे पांडे यांनी म्हटले आहे.

काही लोक आणि एक मध्यस्थ म्हणून खासदार बरहेटमध्येही असेच षडयंत्र घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आम्हाला वेळेवर मिळाली. त्यामुळे आम्ही ते रोखू शकलो, असे पांडे यांनी सांगितले. राजकीयदृष्ट्या पराभूत करू न शकलेल्या नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जाते, ही भाजपची कमजोरी आहे. असा निशाणाही त्यांनी साधला.

दरम्यान, मंडल मुर्मू यांचे पुर्वज सिदो कान्हु, फुलो-झानो व चांद-भैरव यांनी इंग्रजांविरोधात लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यामुळे मुर्मू यांच्या प्रवेशाने सोरेन यांना धक्का बसला आहे. आता भाजपकडून घुसखोरांना राज्यातून हद्दपार करण्याचा नारा देत मुर्मू यांच्या खांद्यावर याबाबतच्या प्रचाराची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT