Election Commission : तीन राज्यांतील निवडणुकीची तारीख बदलली; आयोगाने का घेतला हा निर्णय?

Uttar Pradesh Bihar Punjab Assembly Bypolls : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसह 15 राज्यांतील 48 विधानसभा मतदारसंघात आणि दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन राज्यांतील पोटनिवडणुकीच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. इतर पोटनिवडणुकींच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

भाजप, काँग्रेससह इतर काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. ही मागणी आयोगाने मान्य केली आहे. निवडणूक पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यांमध्ये यापूर्वी 13 नोव्हेंबरला मतदान होणार होते. आता या राज्यांत 20 नोव्हेंबरला होईल.

Election Commission
Madhurima Raje Chhatrapati News : कोल्हापुरच्या 'आखाड्यात' उतरण्यापूर्वीच काँग्रेस चितपट; मधुरीमाराजेंची शेवटच्या क्षणी माघार!

संबंधित राज्यांमध्ये निवडणुकीच्या काळात विविध सण-उत्सव आहेत. त्यामुळे या काळात मतदारांना मतदान करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा 13 नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान आहे.

केरळमध्ये पलक्कड या एकमेव विधानसभा मतदारसंघात 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार होती. पंजाबमध्ये डेरा बाबा नानक, चब्बेवाल, गिद्देरबहा आणि बर्नाला या चार मतदारसंघात याचदिवशी निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

Election Commission
Maharashtra Assembly Election: मविआ, महायुतीची डोकेदुखी वाढली; शेवटपर्यंत 'हे' बंडखोर उमेदवार नॉट रिचेबलच !

उत्तर प्रदेशात मिरापूर, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, सिशामाऊ, फुलपूर, कटेहरी आणि माझवान या नऊ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. आता त्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी मिळणार आहे.

प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजप आणि समाजवादी पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा निम्म्याने कमी झाला. तर समाजवादी पक्षाने 33 जागांवर विजय मिळवत मोठा विजय मिळवला. यापार्श्वभूमीवर नऊ जागांवर पोटनिवडणूक होत असून लोकसभेप्रमाणेच समाजवादी पक्षाला यश मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com