Hafizul Hasan Sarkarnama
देश

Mobile Seized in Assembly : मंत्री विधानसभेत फोनवर बोलला, संतापलेल्या अध्यक्षांनी थेट मोबाईल जप्त केला

Jharkhand Assembly Budget Session Speaker Ravindra nath Mahato seized Minister Hafizul Hasan mobile House : झारखंड विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री हाफिझुल हसन सभागृहात बोलल्याने अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी त्यांचा मोबाईल जप्त केला.

Pradeep Pendhare

Jharkhand Politics Update : झारखंडमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन चांगलेच तापले आहे. काल दोन मंत्री एकमेकांविरोधात भर सभागृहात भिडले होते.

सभागृहात शिस्तचे पालन व्हावे म्हणून, विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो आमदारांविरोधात 'अ‍ॅक्शन मोड'वर आले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन फोन बोलणारे मंत्री हाफिझुल हसन यांचा अध्यक्ष महतो यांनी थेट जप्त केला. मंत्र्यांविरोधात कारवाई केल्याने सत्ताधारी देखील अध्यक्ष महतो यांच्या आक्रमक भूमिकेसमोर नमले आहेत.

झारखंडचे अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज 16 वा दिवस आहे. काँग्रेसचे आमदार प्रदीप यादव सभागृहात आपले म्हणणे मांडत होते. त्याचवेळी मंत्री हाफिझुल हसन मोबाईलवर बोलत होते. आमदार यादव यांनी त्यावरून मंत्री हसन यांना मोबाईलवर बोलू नका असे खुणावले. तरी देखील मंत्री हसन यांचे मोबाईलवर बोलले चालू होते. शेवटी अध्यक्ष महतो यांनी त्यांच्या मोबाईल जप्त केला.

झारखंड विधानसभेत दररोज काही काही घडत आहे. काल दोन मंत्री एकमेकांना भिडले. आज सभागृहात मंत्र्यांचा फोन जप्त करण्यात आला. यामुळेच झारखंड विधानसभेचे अधिवेशन चर्चेत राहिले आहे. काँग्रेस (Congress) आमदार प्रदीप यादव सभागृहात प्रश्न विचारत होते, त्याचवेळी मंत्री हाफिझुल हसन अन्सारी मोबाईलवर बोलत होते. आमदार प्रदीप यादव यांना ऐकण्यास त्रास होत आहे, मंत्री हसन यांनी त्यांचा मोबाईल बंद करा, अशी सूचना केली.

मंत्री हसन यांचे या कृतीची विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांच्याकडे तक्रार केली. त्याचा परिणाम असा झाला की, विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांना मंत्र्याचा फोन मार्शलकडून जप्त केला. मोबाइल जप्तची कारवाई झाली, तेव्हा विधानसभेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते.

हाफिझुल हसन अन्सारी हे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आमदार आहेत, 2021 मध्ये त्यांचे वडील हाजी हुसैन अन्सारी यांच्या निधनानंतर ते पहिल्यांदाच पोटनिवडणूक जिंकून आमदार झाले. राजकारणात येण्यापूर्वी हफिजुल सरकारी नोकरी करत होते. शुक्रवारी विधानसभेच्या पहिल्या सत्रात राज्य सरकारचे दोन मंत्री सुदिव्य कुमार आणि इरफान अन्सारी यांच्यात मारामारी झाली होती. त्यामुळे काही काळ विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT