West Bengal BJP MP : आरडाओरडा केल्यास गळा दाबेल, भाजप नेत्याची महिलांना धमकी; नेमकं काय आहे प्रकरण...

Former BJP MP Dilip Ghosh women road Kharagpur West Bengal controversy : पश्चिम बंगालमधील भाजपचे माजी खासदार दिलीप घोष यांना खरगपूरमधील रस्ता उद्घाटनावेळी महिलांनी विरोध केल्याने वाद झाला.
Former BJP MP Dilip Ghosh
Former BJP MP Dilip GhoshSarkarnama
Published on
Updated on

West Bengal political news : पश्चिम बंगालमधील खरगपूरमध्ये एका रस्त्याच्या उद्घाटनावेळी भाजपचे माजी खासदार दिलीप घोष महिलांवर संतापले. माजी खासदार घोष फक्त संतापावर थांबले नसून, महिलांना धमकावत आक्षेपार्ह शब्दही वापरले. हे संपूर्ण प्रकरण खरगपूर नगरपालिकेच्या मठपाडा भागात घडले.

नव्याने बांधलेल्या काँक्रिट रस्त्याच्या उद्घाटनासाठी माजी खासदार दिलीप घोष आल्यावर त्यांना स्थानिक महिलांनी विरोध केला होता. त्यातून हा वाद उद्भवला.

खासदार असताना का आला नाहीत? असा सवाल दिलीप घोष यांना आंदोलक महिलांनी केला. आम्ही कधीच पाहिले नाही. आता आमच्या नगरसेवकाने रस्ता तयार करून घेतला, तेव्हा तुम्ही उद्घाटन करायला आला आहात का? असा सवाल भाजप (BJP) माजी खासदार घोष यांना संतापलेल्या महिलांनी केला. यावर हा कुणाच्या बापाचा पैसा नाही. मी खासदार असताना यासाठी निधी दिला होता. याबाबत सरकारला जाऊन विचारा, असा टोला घोष यांनी महिलांना लगावला.

Former BJP MP Dilip Ghosh
Amravati District Collector : महसूल खात्यात खळबळ; IAS कटियारांना वेगळाच संशय, एकाच वेळी 14 तहसीलदारांना नोटीस बजावल्या

यावर संतप्त झालेल्या महिलांनी (Women) तुम्ही आमच्या वडिलांना मध्ये का आणता? यावर घोष यांनी मी तुमच्या चौदा पिढ्यांना आठवण करून देईल. यानंतर वातावरण अधिकच तापले आणि आंदोलक महिलांनी घोष यांच्या गाडीला घेराव घातला. यावर संतापलेल्या घोष यांचा संयम सुटला अन् असे ओरडू नका, मी तुमचा गळा दाबेल, अशी धमकी दिली.

Former BJP MP Dilip Ghosh
Supriya Sule : संभाजी भिडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य; शरद पवारांच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळे म्हणाल्या, "झुंडशाहीने..."

भाजपच्या माजी खासदाराने महिलांनी केलेल्या वागणुकीवर टीएमसी नगरसेवक आणि खरगपूरचे माजी आमदार प्रदीप सरकार यांनी या घटनेचा निषेध केला. ते आता खासदार राहिले नाहीत, मग रस्त्याच्या उद्घाटनाला का गेले? अशी टीका त्यांनी घोष यांच्यावर केली. पालिकेने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्यांचा काय संबंध? असा सवाल केला.

माजी खासदार घोष यांनी तिथे जाऊन त्याने आपला संयम गमावला, वडिलांचे नाव घेऊन महिलांचा अपमान केला. मी तिथे नव्हतो, पण त्यांनी माझ्या वडिलांचाही अपमान केला. त्यांनी माफी मागितली पाहिजे. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. माजी खासदार म्हणून त्यांची भाषा, अशी नसावी, अशी टीका खरगपूरचे माजी आमदार प्रदीप सरकार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com