Hemant Soren Sarkarnama
देश

Hemant Soren Arrest : झारखंडमध्ये 'हाय व्होल्टेज' घडमोडी; मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक

Jharkhand Politics : ईडीच्या कारवाईपूर्वीच सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला

Sunil Balasaheb Dhumal

Jharkhand CM Hemant Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोरेन यांना अटक केल्याचे समजते. दरम्यान, सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे झारखंडमध्ये हाय व्होल्टेज राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

कथित भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची चौकशी सुरू असून त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ईडीच्या टीमने सोरेन यांच्या दिल्लीतील घरी रेड टाकली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दोन लक्झरी कार आणि 36 लाख रुपयांची रोकडसह अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. त्यावेळी सोरेन घरी उपस्थित नव्हते. या रेडनंतर मुख्यमंत्री जवळपास 30 तास कुणाच्याही संपर्कात नव्हते.

ईडीच्या टीमने सोमवारी सोरेन यांच्या दिल्लीतील घरी कारवाई केल्यानंतर मंगळवारी दुपारी सोरेन रांचीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आमदारांच्या बैठका घेतल्या. अटक झाल्यास पुढील रणनीती त्या बैठकांमध्ये ठरवण्यात आले. यानंतर बुधवारी सोरेन यांची ईडीने पुन्हा चौकशी सुरू केली. दरम्यान, सोरेन यांनी सोमवारी रेड टाकलेल्या टीममधील अधिकाऱ्यांवर रांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोरेन यांनी ईडी अधिकाऱ्यांविरोधात अट्रॉसिटी कायद्यांतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ईडीने केलेली कारवाई त्रास देण्यासाठी होती. तसेच आपल व आपल्या समाजाची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा झारखंड (Jharkhand) मुख्यमंत्री सोरेने यांनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास रांचीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनीही दुजोरा दिला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT