Ritesh Kumar Transfer : रितेश कुमारांना बढती; आता अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलिस आयुक्त

Maharashtra IPS Officers Transfer : भारतीय पोलिस सेवेच्या १९९५ च्या बॅचच्या रितेश कुमारांची राज्य होमगार्डचे महासमादेशक पदी वर्णी
Ritesh Kumar, Amitesh Kumar
Ritesh Kumar, Amitesh KumarSarkarnama
Published on
Updated on

Pune Police Commissioner : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची राज्य होमगार्डचे महासमादेशक पदी बढती झाली आहे. आता त्यांच्या जागी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 50 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. यात रितेश कुमारांची बढती होऊन मुंबईत होमगार्डचे महासमादेशक म्हणून बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी पुण्याच्या पोलिस आयुक्त (Pune Police Commissioner) म्हणून १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार चार्ज घेतील.

Ritesh Kumar, Amitesh Kumar
Maratha Reservation Survey: मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी, कर्मचारी 'फिल्डवर'; महापालिकेत शुकशुकाट !

रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी डिसेंबर 2022 मध्ये पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. पुण्यातील कारकीर्दीत त्यांनी शहरातील गुन्हेगारांना जरब बसवला. गुन्हेगारी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी मोकोका, एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाई केली. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध योजनाही रावबवल्या. शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यावर त्यांनी मोठा भर दिला.

Ritesh Kumar, Amitesh Kumar
Kolhapur Collector Transfer : कलेक्टरमुळे तीन मंत्र्यांनी व्यक्त केली होती दिलगिरी! अखेर झाली बदली...

शहरातील (Pune Police) 115 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांनी शिक्षा झालेल्या 100 गुन्हेगारांना विविध कारागृहात ठेवले. गुन्ह्यांना आळा घालण्यासह नागरी समस्या सोडवण्यासाठी अशा प्रकारे प्रभावी कारवाई करणारे रितेश कुमार हे राज्यातील पहिले पोलिस आयुक्त ठरले. नुकत्याच झालेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात त्यांनी १७ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, गेले दोन महिने पुण्याचे पुणे पोलिस दलातील सह पोलिस आयुक्तपद रिक्त होते. त्याजागी कोकण परीक्षेत्राचे महानिरीक्षक प्रवीण पावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ritesh Kumar, Amitesh Kumar
NCP MLA Disqualification Case: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचा फैसला? राहुल नार्वेकर 'या' तारखेपर्यंत निकाल देणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com