JNUSU Election Sarkarnama
देश

JNUSU Election Result : पहलगाम हल्ल्यानंतर पहिली निवडणूक; JNU डाव्यांचेच, ABVP नेही रचला इतिहास

Left Parties' Dominance in JNUSU Central Panel : निवडणुकीत युनायटेड लेफ्टने जोरदार कामगिरी करत सेंट्रल पॅनेलमधील तीन जागा जिंकल्या आहेत. AISF-DSF आघाडीचे उमेदवार नितीश कुमार यांनी दणदणीत विजय मिळवत अध्यक्षपद मिळवले आहे.

Rajanand More

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर देशात सर्वांचेच लक्ष लागलेली पहिलीच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाची निवडणूक पार पडली. यापार्श्वभूमीवर निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत अध्यक्षपदावर डाव्यांनी विजय मिळवत विद्यार्थी संघावर कब्जा केला आहे. तर दुसरीकडे भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही इतिहास घडवला आहे.

निवडणुकीत युनायटेड लेफ्टने जोरदार कामगिरी करत सेंट्रल पॅनेलमधील तीन जागा जिंकल्या आहेत. AISF-DSF आघाडीचे उमेदवार नितीश कुमार यांनी दणदणीत विजय मिळवत अध्यक्षपद मिळवले आहे. त्यांना 1702 मते मिळाली. तर एबीव्हीपीच्या शिखा यांना 1430 मतांवर समाधान मानावे लागले. उपाध्यक्षपदावर डीएसफच्या मनीषा यांनी बाजी मारली आहे. त्यांनी एबीव्हीबीच्या नीतू यांचा पराभव केला.

डीएसएफच्या मुन्तेहा फातिमा या महासचिव पदावर विराजमान झाल्या आहेत. त्यांनी एबीव्हीपीचे उमेदवार कुणाल राय यांचा पराभव केला. संयुक्त सचिव पदावर मात्र एबीव्हीबीने विजय मिळवत इतिहास रचला आहे. एबीव्हीबीचे वैभव मीना हे विजयी झाले आहेत. 2015-16 नंतर सेंट्रल पॅनेलमध्ये ABVPला पहिल्यांदाच विजय मिळाला आहे.

सदस्यांच्या निवडणुकीतही एबीव्हीपीचा दबदबा राहिला असून 42 पैकी 23 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 1999 नंतर पहिल्यांदाच एबीव्हीपीने अशी कामगिरी केली आहे. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी २५ एप्रिल रोजी मतदान झाले होते. जवळपास 70 टक्के सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला होता. निवडणुकीसाठी सुमारे साडे पाच हजार विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, निवडणुकीमध्ये ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएसन आणि स्टुटंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटना मागील काही वर्षांत पहिल्यांदाच स्वतंत्रपणे उतरल्या होत्या. त्यामुळे डाव्यांना मतविभाजनाची भीती होती. मात्र, त्याचा फारसा फटका बसला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर काही दिवसांतच ही निवडणूक झाल्याने त्याचे सावट जाणवत होते. एबीव्हीपीकडून या वातावरणाचा फायदा घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. पुन्हा एकदा हा जेएनयूचा गड डाव्यांचाच असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT