Asaduddin Owaisi : 'आयएसआय नाजायज औलाद', पाकिस्तानला ओवैसींनी पुन्हा एकदा फटकारलं

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. ज्यात 26 निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारतासह जगभरातून पाकिस्तानवर टीका होत आहे.
Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack
Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attacksarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. ज्यात 26 निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारतासह जगभरातून पाकिस्तानवर टीका होत आहे. यादरम्यान पुन्हा एकदा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला फटकारत जोरदार टीका केली आहे. त्यांनी आयएसआय ही पाकिस्तानची नाजायज औलाद असल्याची घणाघाती टीका केली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात पाकिस्तानी अंतकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी त्यांनी नाव आणि धर्म विचारत त्यांच्या आयडी तपासत गोळीबार केला. ज्यात देशभरातील 26 निरपराध लोकांचा जीव गेला. ज्यात एका लेफ्टनंटचा देखील समावेश होता. यानंतर आता जगभरातून या हल्ल्याची निंदा होत असून पाकिस्तानविरोधात टीका केली जातेय. तर या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा पाकिस्तानमध्ये घुसून करण्याची मागणी केली जातेय.

यादरम्यान केंद्र सरकारे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाणीबंद करण्यासह बॉर्डर बंदी केली आहे. त्यातबरोबर आज रविवारच्या दिवस निर्धारीत करत पाकिस्तानी नागरीकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. याप्रमाणे अनेक पाकिस्तानी निघाले असून गेल्या तीन दिवसांत वाघा बॉर्डरवरून 450 हून अधिक भारतीय पाकिस्तानातून मायदेशी परतले आहेत.

Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack
Asaduddin Owaisi News : ओवेसींचे मुस्लिमांना मोठं आवाहन; देशात शुक्रवारी दिसणार एकजुटता, अलर्टही केले...

दरम्यान आता असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारतं टीका केली आहे. त्यांनी, आपण काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला आहे. याच्याआधी देखील अशा पद्धतीने अनेकवेळा काश्मीरवर हल्ले पाकिस्तानने केले आहेत. त्यावेळी अनेक निरपराध लोक मारले गेले आहेत. पठाणकोट, वैष्णोदेवी अशा अनेक घटनांचा यामध्ये समावेश होता.

पण यंदा पाहिल्यांदाच दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांना वेगळं केलं. त्यांचा धर्म विचारला, त्यांना कुराणची आयत म्हणण्यास सांगितली आणि गोळ्या घातल्या. मात्र अशा पद्धतीने निरपराध लोकांना आमच्या इस्लाममध्ये मोठा गुन्हा आहे. जे या लोकांना माहित नाही. अनेक वर्षांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत आला असून आयएसआय पाकिस्तानची नाजायज औलाद असल्याची टीका ओवैसी यांनी केली आहे.

तसेच ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींनावरही टीका करताना त्यांनी काश्मीरी मुस्लिमांवर संशय घेवू नये अशी मागणी केली आहे. काश्मीर हा भारताचा भाग असून येथील काश्मिरी लोक आपल्या देशाचे अंग आहेत. यामुळे तुम्ही त्यांच्यावर कसा संशय घेऊ शकता? असा सवाल उपस्थित केला आहे. तर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी याच काश्मीरी मुस्लिमांनी पर्यटकांची मदत केली होती. आता पाकिस्तानचा हेतूच हा भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा आहे. त्याला येथील प्रसारमाध्यमं हिंदू -मुस्लिम वक्तव्य करून खत-पाणी देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack
Asaduddin Owaisi on Waqf : 'वक्फ'ची एक इंचही जमीन सोडणार नाही, मी...' ; ओवेसींचं विधान चर्चेत!

याआधी सर्जिकल स्ट्राईक, बालकोट, नोटबंदीच्या निर्णयांचं स्वागत करताना आम्ही सरकारचं कौतुक केलं होतं. पण आता पाकिस्तानविरोधात अशी कारवाई करा की, येथून पुढे एकाही भारतीयाचा जीव गेला नाही पाहिजे, असेही आवाहन त्यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com