जोहरान ममदानी यांची मोदींवर टीका : न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी दिवाळी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या विचारसरणीवर टीका केली, म्हणाले — “मोदींच्या भारतात केवळ काही भारतीयांनाच जागा आहे.”
वादाची शक्यता : भारतीय-अमेरिकी समुदायाच्या कार्यक्रमातील या वक्तव्यामुळे अमेरिकेत आणि भारतातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.
राजकीय परिणाम : मोदींवरील सततच्या टीकेमुळे काही भारतीय मतदार नाराज असून, याचा परिणाम ममदानी यांच्या निवडणुकीत होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत
Criticism Targeted at Prime Minister Narendra Modi and the BJP : अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जोहरान ममदानी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमातच त्यांनी विचारसरणीवरून थेट भाष्य केले आहे. जोहरान हे भारतीय वंशाचे नेते आहेत.
भारतीय-अमेरिकी कम्युनिटी कार्यक्रमात जोहरान यांच्या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्यांनी खासकरून पंतप्रधान मोदींनी अनेकदा लक्ष्य केले आहे. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मी ज्या भारतात वाढलो, तो बहुलवादी भारत होता. जिथे सर्वधर्मीय लोक सोबत राहत होते. मोदी आणि भाजपवर मी टीका करतो कारण, त्यांच्या विचारसरणीमध्ये केवळ काही भारतीयांनाच जागा आहे.
मी न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदाची निवडणूक लढत आहे, हे मला माहिती आहे. हे शहर 8.5 मिलियन लोकांचे आहे. या शहरातील अनेक लोकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वेगळे मत असू शकते. तो त्यांचा अधिकार आहे. पण मी सर्वांचे एकसारखे प्रतिनिधित्व करेन. न्यूयॉर्कमधील प्रत्येक जण सुरक्षित राहील, आरामात राहील, याची शाश्वती देणे, हे माझे कर्तव्य आहे, असेही जोहरान म्हणाले.
जोहरान ममदानी हे भारतीय-अमेरिकी चित्रपट निर्मात्या मीरा नायक यांचे पुत्र आहेत. मात्र, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करत असतात. मोदींचा उल्लेख त्यांनी युध्द आरोपी असाही केला होता. गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीवरून ते सातत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत असतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मात्र जोहरान ममदानी यांच्या भूमिकेवरून त्यांना लक्ष्य करत असतात. ममदानी हे स्वत:ला डेमोक्रेटिक सोशलिस्ट मानतात. न्यूयॉर्कमधील भारतीय मतदारांपर्यंत पोहण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. मात्र, मोदींवरील सातत्याने टीकेमुळे अनेक भारतीय नाराज आहे. याचा फटका जोहरान यांना निवडणुकीत बसू शकतो.
Q1: जोहरान ममदानी कोण आहेत?
A: ते भारतीय वंशाचे अमेरिकन नेते असून, न्यूयॉर्क सिटी महापौरपदासाठी निवडणूक लढवत आहेत.
Q2: त्यांनी मोदींवर नेमकी कोणती टीका केली?
A: त्यांनी म्हटले की, मोदी आणि भाजपची विचारसरणी बहुलवादी भारताला विभाजित करते आणि फक्त काही लोकांसाठीच जागा ठेवते.
Q3: हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
A: दिवाळीनिमित्त आयोजित भारतीय-अमेरिकी समुदायाच्या कार्यक्रमात.
Q4: त्यांच्या वक्तव्याचा परिणाम काय होऊ शकतो?
A: भारतीय मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, ज्याचा परिणाम त्यांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.