
India political news : देशातील भ्रष्टाचार मुळासकट उपटून टाकण्याची जबाबदारी लोकपालांवर आहे. त्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीत मोठं आंदोलन केलं होतं. पण आज हेच लोकपाल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. त्याचे कारणही तसंच आहे. लोकपालांचा शाही थाट चर्चेत आला आहे. लोकपालांना 70 लाखांच्या बीएमडब्ल्यू कार मधून फिरायचे आहे.
लोकपाल ऑफ इंडियाने अध्यक्ष आणि इतर सहा सदस्यांसाठी सात बीएमडब्ल्यू सेडान खरेदी करण्यासाठी टेंडर जारी केले आहेत. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. एका गाडीची किंमत तब्बल 70 लाख असून 7 गाड्यांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ता. 16 ऑक्टोबर रोजी हे टेंडर जारी झाल्यापासून त्यावरून सोशल मीडियात चर्चा झड़ू लागल्या आहेत.
टेंडरमध्ये बीएमडब्ल्यू कंपनी चालक आणि कर्मचाऱ्यांना सात दिवसांचे ट्रेनिंग तसेच गाड्यांची संपूर्ण माहिती देईल, असेही नमूद करण्यात आले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून म्हटले आहे की, सरकारने लोकपालला धुळीस मिळवले आहे. ज्यांना भ्रष्टाचाराने काही फरक पडत नाही, अशा लोकांची नियुक्ती केली आहे. आता हे लोक 70 लाखांची बीएमडब्ल्यू खरेदी करत आहेत.
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांना बीएमडब्ल्यू गाडी कशासाठी हवी आहे, असा सवाल केला आहे. या गाड्यांसाठी लोकांचा पैसा कशासाठी खर्च करायचा? लोकपालमधील किमान एक-दोन सदस्य तरी या गाड्या घ्यायला विरोध करतील, अशी आशा असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
लोकपाल कोण आहेत?
सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर हे भारताचे लोकपाल आहेत. ता. १० मार्च २०२४ रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्यांमध्ये निवृत्त न्यायमूर्ती एल. नारायण स्वामी, निवृत्त न्यायमूर्ती संजय यादव, निवृत्त न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्यासह सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिरके यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.