Yashwant Varma Sarkarnama
देश

Yashwant Varma: न्यायाधीशांच्या घरातून जळालेल्या नोटा काढणारी व्यक्ती कोण?? सुप्रीम कोर्टाचे तीन प्रश्न; वर्माचं उत्तर....

घराला लागलेली आग आणि या आगीत सापडलेल्या जळालेल्या नोटा यावरुन सुप्रीम कोर्टानं त्यांना प्रश्न विचारले आहेत.14 मार्च 2025 रोजी मध्यरात्री न्यायमूर्ती वर्मा यांच्या घराला आग लागली होती. त्या आगीची 'धग'सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचली आहे.

Mangesh Mahale

Justice Yashwant Varma Latest News: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात आढळलेली कोट्यवधीची रक्कम कुठून आली, याबाबतचा तपास सुरु आहे. त्यांच्या सरकारी बंगल्याला लागलेल्या आगीत जळालेल्या नोटा आढळल्या आहेत. यावर सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीकडून चौकशी केली जात आहे.

सुप्रीम कोर्टाच्या समितीने केलेल्या तीन प्रश्नावर यशवंत वर्मा यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या घराला लागलेली आग आणि या आगीत सापडलेल्या जळालेल्या नोटा यावरुन सुप्रीम कोर्टानं त्यांना प्रश्न विचारले आहेत.14 मार्च 2025 रोजी मध्यरात्री न्यायमूर्ती वर्मा यांच्या घराला आग लागली होती. त्या आगीची 'धग'सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचली आहे.

वर्मा यांच्या घरात आढळलेल्या कोट्यवधीच्या नोटांचा ते हिशेब कसा देणार, या पहिला प्रश्न आहे. त्या खोली आढळलेल्या जळालेल्या नोटा कुठून आल्या होत्या, हा दुसरा प्रश्न आहे. तर तिसरा हा महत्वाचा प्रश्न म्हणजे 15 मार्च 2025 रोजी आग लागली तेव्हा खोलीतून जळालेल्या नोटा काढणारी व्यक्ती कोण होती? असे प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारले आहेत. आपला मोबाईल आणि त्यामधील डाटा नष्ट करु नका, असा आदेश सुप्रीम कोर्टानं वर्मा यांना दिला आहे.

यशवंत वर्मा यांनी कोर्टाला लिखीत स्वरुपात उत्तर दिले आहे. माझ्या घरातील स्टोअररुम मध्ये आढळलेल्या पैशांच्या बाबतीत मला माहीत नाही. माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला या रुपयांबाबत कुठलीही कल्पना नव्हती. याच्याशी माझा आणि माझ्या कुटुंबियांचा संबध नाही. ज्या दिवशी रात्री माझ्या घराला आग लागली त्या दिवशी माझ्या परिवारातील कुणालाही ही रक्कम दिसली नाही, असे पहिल्या प्रश्नांचे उत्तर वर्मा यांनी दिले आहे. पहिल्या प्रश्नाच्या उत्तराच दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असल्याचे वर्मा यांनी नमूद केले आहे.

तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर....

माझ्या बंगल्याच्या स्टोअररुमधून पैसे सापडले हा आरोप चुकीचा आहे, आम्हाला जळालेल्या नोटांची पोती दिसली नाही. आम्ही कुणालाही दिली नाही. आगात जळालेल्या वस्तू अजूनही बंगल्याच्या एका कोपऱ्यात आहे. माझी पत्नी 15 मार्च रोजी सांयकाळी विमानाने भोपाळहून परत आली होती. त्यामुळे तिला विचारण्यात येणारे प्रश्न निरर्थक आहे. वर्मा यांच्या घरात कोट्यवधीची रक्कम सापडल्यानंतर त्यांची बदली अलहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाची एक समिती चौकशी करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT