Lok Sabha Election News 2024  Sarkarnama
देश

KCR News : के. चंद्रशेखर रावांना आयोगाचा दणका; 'या' कालावधीत प्रचार करण्यावर बंदी...

Chetan Zadpe

Telangana News : निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना जोरदार दणका दिला आहे.आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता राव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राव यांच्यावर 48 तासांसाठी प्रचार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ही प्रचारबंदी त्यांच्यावर आज रात्री आठ वाजल्यापासून सुरु होईल. त्यामुळे हा राव यांना मोठा धक्का आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगण काँग्रेसचे नेते जी. निरंजन यांनी राव यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. दाखल केलेल्या या तक्रारीच्या आधारे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. ज्यामध्ये राव यांच्यावर काँग्रेसविरोधात अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता.

निवडणूक आयोगाने (Election) आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आयोगाने बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यावर आदर्श आचारसंहिता भंगाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान टिपले आहे. आयोगाला हे विधान आक्षेपार्ह वाटले.

घटनेच्या कलम 324 चा हवाला देत आयोगाने के चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांना आज रात्री 8 वाजल्यापासून 48 तासांसाठी कोणत्याही जाहीर सभा, सार्वजनिक मिरवणूक, सार्वजनिक रॅली, कार्यक्रम आणि मुलाखती, मीडिया (इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया) मध्ये जाहीर भाषण करण्यास मनाई केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT