Telangana Election: मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध भिडणार 'बीआरएस'चाच माजी नेता

BJP News: भाजपची तेलंगणासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री राव यांच्या विरुद्ध भाजपचे राजेंद्र इटाळा मैदानात
 K Chandrasekhar Rao
K Chandrasekhar RaoSarkarnama
Published on
Updated on

Telangana News: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामध्ये छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम या राज्यांचा समावेश असून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. तेलंगणा विधानसभेसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याविरोधात भाजपने तगडा उमेदवार दिला आहे. आता भाजपचे राजेंद्र इटाळा हे मुख्यमंत्री राव यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. भाजपने जाहीर केलेल्या यादीत 52 उमेदवारांची घोषणा केली आहे. गजवेल आणि हुजुराबाद या दोन मतदारसंघामधून भाजपकडून राजेंद्र इटाळा निवडणूक लढवणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 K Chandrasekhar Rao
BJP Assembly elections News : भाजपचा मेगा प्लॅन ठरला ! एकाच दिवशी ४० नेत्यांच्या ४० ठिकाणी सभा

राव यांच्याविरोधात 'बीआरएस'चा माजी नेता

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याविरोधात भाजपकडून राजेंद्र इटाळा हे निवडणूक लढवणार आहेत. राजेंद्र इटाळा हे भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाचे सदस्य होते. मात्र, आता गजवेल मतदारसंघातून ते मुख्यमंत्री राव यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेसने 15 ऑक्टोबरला 55 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तर आता भाजपनेही 52 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच 'बीआरएस'नेही 115 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्या राज्यात कोणत्या राजकीय पक्षाला यश मिळते, यावरून भविष्यात अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.

Edited by Ganesh Thombare

 K Chandrasekhar Rao
Operation Lotus : कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोट्‌स’; भाजपकडून काँग्रेस आमदारांना मोठ्या ऑफर, ‘डीकें’ची कबुली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com