Kangana Ranaut, BJP MP alleging receipt of a ₹1 lakh electricity bill from Himachal Pradesh power authorities.  Sarkarnama
देश

Kangana Ranaut: भाजपच्या वादग्रस्त खासदार कंगना रनौत अडचणीत,थेट देशद्रोहाचा खटला चालणार; अखेर कोर्टानं घेतली अ‍ॅक्शन

Kangana Ranaut Case: हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर खासदारकी जिंकल्यानंतर कंगना आता राजकारणात नेहमी चर्चेत असते. पण बिनधास्त कंगना रनौत पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडली आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News : बॉलिवूड गाजवल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने राजकारणात एन्ट्री घेतली. फटकळ स्वभाव आणि वादग्रस्त विधानांनी तिनं राजकारणही तापवत असते. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर खासदारकी जिंकल्यानंतर कंगना आता राजकारणात नेहमी चर्चेत असते. पण बिनधास्त कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडली आहे. तिच्याविरोधात आता थेट देशद्रोहाचा खटला चालवला जाणार आहे.

हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघाच्या खासदार आणि भाजप नेत्या कंगना रनौत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनानं शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनिकांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधान केलं होतं. आता याच विधानांप्रकरणी दाखल करण्यात याचिकेवर आता न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी सुरु झाली आहे. कंगना रनौतविरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जाणार आहे.हा खासदार रनौतसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजप (BJP) नेत्या कंगना रनौत यांच्याविरोधात आग्रा न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ती न्यायालयानं स्वीकारली आहे. या संबंधित याचिकेत कंगनावर शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनिकांविरोधात केलेल्या विधानांप्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी सुरु झाली आहे.

कंगना रनौतनं त्यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. बरं झालं, केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते”, असं वक्तव्य केलं होतं. “शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती,असं रनौत यांनी म्हटलं आहे.

तसेच भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं होतं, असं महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्या लढ्याचं अवमान करणारं वक्तव्य कंगना रनौतनं करत खळबळ उडवून दिली होती.तसेच तिनं मुंबईचा उल्लेख पीओके ( पाकव्याप्त काश्मीर) असा केला होता. यामुळेही नवा वाद पेटला होता. या दोन्ही संतापजनक वक्तव्याविरोधात राजीव गांधी बार असोसिएशनचे अध्यक्ष रमाशंकर शर्मा यांनी आग्रा न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आग्र्यातील एका स्थानिक न्यायालयात रमाशंकर शर्मा यांनी ही याचिका 11 सप्टेंबर 2024 रोजी दाखल केली होती. या याचिकेत कंगना रनौत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शेतकरी वर्गाचा अपमानित केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

याचदरम्यान, शर्मा यांनी खासदार कंगनाच्या 1947 साली भीक मागून स्वातंत्र्य मिळालं म्हणत महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याचा अपमान केल्याचा आरोपही याचिकेत केला होता.

आग्रा न्यायालयानं या याचिकेसंबंधी वारंवार नोटिसा पाठवूनही भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत किंवा त्यांच्या टीमकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नव्हतं. महत्त्वाची बाब म्हणजे आग्रा न्यायालयानं कंगना रनौत यांना याआरोपांप्रकरणी स्वत:ची बाजू मांडण्याची पुन्हा एक संधी दिली होती. पण त्यावरही काही उत्तर न आल्यानं न्यायालयानं आता सुनावणीस सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT