

Pune News: पुणे शहरातील नवले ब्रिजजवळ गुरुवारी(ता.13) भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नवले पुलावर भीषण अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची माहिती आहे.
पुण्यातील नवले पुलाजवळ नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा याचठिकाणी भीषण अपघाताची घटना घडली. 3 ते 4 गाड्यांची धडक बसल्याने हा अपघात (Accident) घडला.
दोन कंटेनरच्यामध्ये एक कार जळत असल्याचं दिसून येत आहे. अपघातानंतर काही वेळासाठी नवले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली होती. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.
साताऱ्याकडून पुण्याकडे (Pune) दिशेनं येणार्या महामार्गावरती हा अपघात झाला. हा अपघात सात ते आठ वाहनांचा झाला आहे. या अपघातात सर्वच वाहनं चक्काचूर झाली आहेत. पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर दाखल झाल्या आहेत. पेटलेली वाहनं विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यातील हा अपघात इतका भीषण होता की, गाड्यांची एकमेकांना धडक बसल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. यात एका कारचाही समावेश आहे. याठिकाणी आता पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून बचावकार्य वेगानं सुरू आहे.
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे, जिथे दोन कंटेनर एकमेकांना धडकले. या धडकेनंतर एका कंटेनरला भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. अपघाताची भीषणता इतकी होती की, आगीच्या मोठ्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या. या घटनेमुळे पुणे-बंगळूरू मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ थांबवल्यावंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.