Kangana Ranaut Sarkarnama
देश

Kangana Ranaut viral photo truth : अभिनेत्री कंगना रणौतच्या लग्नाची जोरदार चर्चा; स्वतःच पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा!

Kangana Ranaut marriage news : अभिनेत्री कंगना रणौतच्या लग्नाच्या चर्चांमध्ये भर पडली असताना तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला. जाणून घ्या नेमकं काय म्हणाली अभिनेत्री.

Rashmi Mane

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अलीकडेच त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोंमध्ये त्या गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर लाल टिकली आणि पारंपरिक साडीच्या लूकमध्ये दिसत होत्या. त्यामुळे चाहत्यांमध्ये “कंगना यांनी गुपचूप लग्न केलं का?” अशी चर्चा रंगू लागली होती.

सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या लग्नाबद्दल अंदाज व्यक्त केले. काही चाहत्यांनी अभिनंदनाचे संदेशही पोस्ट केले. मात्र या चर्चांना अखेर स्वतः कंगना यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या अफवांवर प्रतिक्रिया देत सत्य स्पष्ट केलं.

Kangana Ranaut

कंगना यांनी एका व्हायरल बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं की, त्या सध्या सतत शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्या एका भूमिकेसाठी तयार झालेल्या मेकअप आणि लूकमध्ये होत्या. त्याचवेळी कुणीतरी त्यांचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यानंतर लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली.

त्यांनी पुढे म्हटलं की, “एका विवाहित महिलेच्या लूककडे एवढं वेगळं का पाहिलं जातं? कलाकार विविध भूमिका साकारत असतात. मी गुपचूप लग्न करणार नाही, हे नक्की.” दरम्यान, कंगना यांचा हा पारंपरिक लूक नेमका कोणत्या चित्रपटासाठी आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र सोशल मीडियावर हा लूक ‘तनू वेड्स मनू 3’ किंवा ‘क्विन’च्या सिक्वेलशी संबंधित असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर काही काळ चित्रपटांपासून दूर राहिलेल्या कंगना आता पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT