Nashik MLC Election : तर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप भुजबळांच्या पसंतीचा उमेदवार देणार, नाशिकच्या रणधुमाळीतील पडद्याआडची गोष्ट

BJP and Shiv Sena Clash Over Nashik MLC Seat : शिवसेना व भाजपमध्ये विधानपरिषदेचा फॉर्म्युला ठरवत असताना नाशिकची जागा कळीचा मुद्दा बनला आहे. शिवसेनेने ही जागा भाजपला न सोडल्यास येथे मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde, Chhagan Bhujbal
Eknath Shinde, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : विधानपरिषदेच्या नाशिकच्या जागेवरुन भाजप व शिवसेनेत धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितल्याने इथे महायुती फिस्कटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत नाशिकची जागा शिवसेनेकडे होती. शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे निवडून आले होते. त्यामुळे पारंपारिक लढतीचा दाखला देत शिवसेनेने सर्वात आधी या जागेवर दावा ठोकला. ज्या पक्षाकडे विधानपरिषदेची जागा आहे, त्यांनीच ती लढवावी असा मतप्रवाह आहे. असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वप्रथम या जागेवर दावा सांगितला.

त्यानंतर भाजपचे शहाराध्यक्ष सुनिल केदार यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून नाशिकमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद आणि सर्वाधिक मतदारसंख्या लक्षात घेता ही जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेही नाशिकची जागा भाजपकडे ठेवण्यास अनुकूल असल्याचे समजते आहे.

विधानपरिषदेच्या जागेसाठी उपलब्ध आकडेवारीनुसार ६१९ सदस्य मतदान करणार आहेत. यात महायुतीचे पारडे जड असून महायुतीकडे ४६६ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यात भाजपकडे सर्वाधिक १८८, शिवसेनेकडे १७१ तर राष्ट्रवादीकडे १०७ सदस्य आहेत. सर्वांधिक मतदारसंख्या भाजपकडे असल्याने भाजपला ही जागा हवी आहे. परंतु महायुतीत शिवसेनेने ही जागा भाजपला सोडण्यास नकार दिल्यास दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे असा अंदाज काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहे.

Eknath Shinde, Chhagan Bhujbal
MLC Election : मुलाच्या आमदारकीसाठी गुलाबराव पाटलांचा आटापीटा : नरेंद्र दराडेंचा 'राजकीय बळी' जाणार? भाजप-शिवसेनेत नाशिक-जळगावच्या जागेची अदलाबदल?

दरम्यान शिवसेना-भाजप यांच्यात मैत्रिपूर्ण लढत झाल्यास राष्ट्रवादीचा कल महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे अशापरिस्थितीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला सोबत घेण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर भाजपकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या पसंतीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ शकते अशीही माहिती सूत्रांकडून कळते आहे.

शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे किंवा आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. दोघेही प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु कांदे व दराडे दोघेही भुजबळांचे कट्टर विरोधक आहेत. कांदे विरुद्ध भुजबळ किंवा भुजबळ विरुद्ध दराडे हे राजकीय वैर जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. त्यामुळे नरेंद्र दराडे किंवा अंजुम कांदे शिवसेनेने कुणालाही उमेदवारी दिली तर त्यांच्याविरोधात मंत्री भुजबळ भाजपला मदत करणार यात शंका नाही.

Eknath Shinde, Chhagan Bhujbal
MLC Election : नाशिक विधानपरिषदेसाठी इच्छुकांची संख्या मारुतीच्या शेपटीसारखी वाढली, शिंदे-फडणवीसांपुढे पेच

त्यामुळे भुजबळांच्या मदतीने भाजप शिवसेनेला शह देण्याची रणनिती आखू शकते. त्यासाठी भाजपकडून भुजबळांच्या पसंतीचा उमेदवार दिला जावू शकतो. तशा हालचाली देखील राजकीय वर्तुळात सुरु आहेत अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे. शिवाय भाजप-राष्ट्रवादी समीकरण जुळल्यास त्यांचे संख्याबळही बहुमताच्या अगदी जवळ पोहचत असल्याने भाजपला विजय खेचून आणणेही सोपे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com