

गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणून लढण्याचा निर्धार झाल्यानंतर महायुतीच्या व जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाच्या चर्चेतच फिसकटले आहे. भाजपला कमी जागा देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ठेवल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाचे राजकारण आरोप प्रत्यारोपाने ढवळून निघाले आहे.
अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील जागा वाटपाचा चेंडू पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे. महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
गोकुळ बद्दल लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. संघाची लवकर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटत. अजून मतदार यादी तयार झाली नाही. पण महायुतीमध्ये कुणाला किती जागा याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. गोकुळ निवडणुकीसाठी आम्ही महायुती म्हणून समोर जाऊन जिंकणार आहोत, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
आमदार शिवाजी पाटील यांनी माझ्यावर व्यक्तिगत बदनामी केली होती. टीका केली होती.मी पुरावे द्या म्हणून शिवाजी पाटील यांना सांगितलं होतं. मी दिलेली मुदत संपली आहे आता मी कायदेशीर सल्ला घेऊन मला पुढचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा मंत्री मुश्रीफ यांनी इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.