Shivendra Raje Bhosale Sarkarnama
देश

Shivendraraje Bhosale : कर्नाटक पोलिसांनी राजेंची आब राखली; कन्नड संघटनांना दिला घरचा आहेर

Unveiling of the statue of Dharmaveer Sambhaji Maharaj at Karnataka : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिल्या. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. पण विरोध करणाऱ्या कन्नड संघटनांना बेळगाव पोलिसांनीच रोखले.

Aslam Shanedivan

Belgaon News : बेळगाव जिल्ह्यातील अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण बुधवारी (ता.28) झाले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणानंतर ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिल्याने कन्नड भाषिकांचा अवमान झाल्याचा, कांगावा कन्नड संघटनांनी केला. तसेच बेळगाव पोलिसांकडे तक्रार करत तक्रारीची तपासणी करण्याची मागणी करत हंगामा केला. पण या कन्नड संघटनांना बेळगाव पोलिसांनी घरचा आहेर देत ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिल्याने कोणाचाही अवमान होत नाही, असे म्हणत घरचा आहेर दिला आहे. यामुळे सीमाभागात बेळगाव पोलिसांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वशंज असणाऱ्या राजेंची आब राखली, अशा कौतुक केले जात आहे.

अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मारकाचा अनावरण सोहळ्याला महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित झाला. यावेळी भोसले यांनी आपल्या भाषणाची सांगता करताना ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्या. तसेच जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमदार अभय पाटील, महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांनी देखील टाळ्या वाजवत त्याला दुजोरा दिला. यावरून आता कन्नड संघटना सातत्याने वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत

गेल्या दोन दिवसांपासून कन्नड संघटनांनी या कार्यक्रमावरून वातावरण तापवायला सुरूवात केली आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ घोषणा दिल्याने कन्नड भाषिकांचा अवमान झाल्याचा आरोप केला आहे. यावरून कन्नडीगांनी टिळकवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. तर जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांचीही भेट घेऊन कार्यक्रम शिष्टाचाराचे उल्लंघन करून पार पाडला. तसेच, कार्यक्रमावेळी ‘जय महाराष्ट्र’ असा उल्लेख करून कर्नाटकातील जनतेचा अवमान करण्यात आल्याची तक्रार केली. तसेच याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबतचे साक्षी पुरावे देण्याची सूचना केली होती. त्यानंतर कन्नड संघटनांनी कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यात आल्याचा पुरावा दिला आहे, अशी माहिती देत लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी शिष्टाचाराचे उल्लंघन करून कार्यक्रम करण्यात आल्याचे प्रकरण पोलिसांच्या अखात्यारीत येत नाही, ते न्यायालयाच्या अखत्यारीत येते. तर कार्यक्रमावेळी कोणाचाही अवमान झाल्याचे दिसून आलेले नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमावेळी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने कन्नड जनतेचा अवमान झाला आहे, असे म्हणत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड संघटनांना बेळगाव पोलिसांनी फटकारले. तर एकाप्रकारे घरचा आहेर दिल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT