Shivendraraje Bhosale : साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाबाबत शिवेंद्रराजे भोसलेंचे मोठे भाष्य; म्हणाले ‘आमच्या नाराजीचे...’

Satara Guardian Minister : मुख्यमंत्री आणि माझ्यात कोणताही फोन झालेला नाही. तसेच, भाजपमध्ये मागून घेण्याची कोणतीही पद्धत नाही. पालकमंत्रिपद, मंत्रिपद मागून घ्या, अशी भाजपमध्ये पद्धत नाही.
Shambhuraj Desai-Shivendraraje Bhosale
Shambhuraj Desai-Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara, 25 January : महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरून जोरदार धुसफूस सुरू आहे. रायगडचे पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसैनिकांनी रायगडमध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली होती. रायगडचा वाद शांत होतो न होतो तोच साताऱ्यात भाजपचे कार्यकर्ते शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला, त्यावर आता खुद्द शिवेंद्रराजेंनी भाष्य केले आहे.

पालकमंत्रिपदाची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे, त्यामुळे नाराजी असण्याचे कोणतेही कारण नाही. ज्यांच्यावर साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे, ते पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतील, असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी स्पष्ट केले.

लातूरचे पालकमंत्री भोसले म्हणाले, मुख्यमंत्री आणि माझ्यात कोणताही फोन झालेला नाही. तसेच, भाजपमध्ये मागून घेण्याची कोणतीही पद्धत नाही. पालकमंत्रिपद, मंत्रिपद मागून घ्या, अशी भाजपमध्ये पद्धत नाही. पालकमंत्रिपद (Guardian Minister) वाटपाचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकारात पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर आमची कोणाचीही कधीच नाराजी नव्हती आणि नाही.

Shambhuraj Desai-Shivendraraje Bhosale
Ajit Pawar : तुमच्याकडून सांगितली जाईल तेवढी आर्थिक तरतूद विधी व न्याय विभागाला केली जाईल : अजित पवार

शंभूराज देसाईच्या स्वागताला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नव्हते, यावर शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, असं काही नाही. शंभूराज देसाई हे साताऱ्याचे सुपुत्र आहेत. यापूर्वीही ते साताऱ्याचे पालकमंत्री होते. महायुतीमधील आमचे ते सहकारी आहेत. मंत्री म्हणून आम्ही आता काम करत आहोत. जिल्ह्यातील आम्ही चौघेही मंत्री सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी हातात हात घालून काम करणार आहोत. आमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, लोकांमध्ये नाराजीच्या होत राहते, त्या नाराजीच्या चर्चेला काहीही अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Shambhuraj Desai-Shivendraraje Bhosale
Nagpur Politic's : काँग्रेसच्या आंदोलनाची बावनकुळेंनी उडवली खिल्ली; म्हणाले ‘हे तर फक्त फोटोसेशन...’

दरम्यान, सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार निवडून आलेले आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत, त्यामुळे आमदारांच्या संख्येचा निकष लावून साताऱ्याचे पालकमंत्रिपद हे भारतीय जनता पक्षाकडे देण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांंच्या समर्थक सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी केली आहे. तसेच, उद्या प्रजासत्ताकदिनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com