Digvijaya Singh, Kapil Sibal, SHarad Pawar Sarkarnama
देश

Opposition Leaders : विरोधीपक्षांच्या नेत्यांसह कपील सिब्बलही 'ईव्हीएम' विरोधातील लढाईच्या मैदानात!

EVM Machine : मशीन बंद पडली की भाजपलाच मत जाते

सरकारनामा ब्युरोे

Congress vs BJP : देशात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनीक वोटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) विरोधकांनी वारंवार निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्याला आयोगाने अद्यापही उत्तर दिलेले नाही. 'ईव्हीएम'वर असलेल्या शंकाचे निवडणूक आयोग निरसन करत नाही. त्या पार्श्वभूमिवर विरोधकांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषदे घेतली. त्यावेळी द्विग्विजय सिंह, विधिज्ञ कपील सिब्बल, शरद पवार उपस्थित होते. यापूर्वी निवडणूक आयोगाने उत्तरे दिली नाहीत. आता आयोगाकडे शेवटच्यावेळी जाणार आहे. त्याच प्रश्नांची उत्तर लेखी मागणार. मिळाले नाही तर सर्व विरोधक पुढील दिशा ठरवू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी 'ईव्हीएम'बाबत फक्त विरोधी नेत्यांच्या मनात प्रश्न नाहीत तर जनतेलाही शंका आहे. त्यामुळे निवडणूक आयोगना शंकाचे निरसन करणे क्रमप्राप्त आहे. मात्र ते होताना दिसत नसल्याचा आरोप केला.

दिग्विजय सिंग Digvijaya Singh म्हणाले, "सर्व विरोधाकांनी मिळून निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारले होते. त्याबाबात दिलेल्या अहवालानुसार २ मे २०२२ मध्ये पुन्हा आठवण करून दिली. मात्र अद्यापपर्यंत उत्तर मिळाले नाही. दरम्यान, निवडणूक आयोगाने 'रिमोट ईव्हीएम'बाबत सर्व पक्षांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी सरसरकट सर्व पक्षांनी 'रिमोट ईव्हीएम'ला विरोध दर्शविला होता. तसेच त्या मशीनच्या डेमोलाही विरोध केला."

'ईव्हीएम' EVM बाबत आता अनेक खुलासे होत असल्याचेही सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, "ईव्हीएमला विरोध नाही, मात्र मशीनबाबत देशात शंकेचे वातावरण आहे. ही मशीन 'स्टँड अलोन' आहे, असे आधी सांगितले जात होते. त्यानंतर आता ती मशीन 'स्टँड अलोन' नाही म्हणतात. कारण उमेदवाराचे नाव आणि चिन्हा इटरनेटद्वारे टाकले जातात. तसेच मशीन 'वन टायप प्रोग्रॅमेबल सेफ' आहे. आता त्यांनी स्वीकर केली ही मशीन 'मल्टीपल प्रोग्रॅमेबल सेफ' आहे. आयोगाच्या या बदलत्या भूमिकांमुळे विरोधकांसह जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत."

निवडणुकीत विजय-पराभव ठरलेला असतो. मात्र चुकीच्या पद्धतीने कुणी जिंकून येत असेल तर ते मान्य नसल्याचे सांगून ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल (Kapil Sibal) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.

सिब्बल म्हणाले, "ईव्हीएमबाबत विरोधक आणि नागरिकांच्या मनातील शंका दूर झाली पाहिजे. दरम्यान, वारंवार विचारूनही निवडणूक आयोग (Election Commission of India) उत्तर देत नाही. त्यामुळे आता शेवटचेच आयोगाकडे जाणार आहे. त्यावेळी आमच्या प्रश्नांची उत्तरे लेखी मागणार आहे. आता आयोगाने आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही, तसेच मशीन कसे काम करते याबाबत माहिती दिली नाही तर आम्ही सर्व विरोधक एकत्र बसून पुढची दिशा ठरविणार आहोत. यापूर्वी ज्या-ज्या वेळेस 'ईव्हीएम' मशीन खराब झाली त्या-त्या वेळी भाजपला मते गेल्याचे निदर्शनास आले आहे."

आमचा मशीनवर आक्षेप नाही,पण मशीनमध्ये छेडछाड करता येऊ शकते. ती कशी केली जाते, कोण-कधी करते याबाबत प्रश्न असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. सिब्बल म्हणाले, "ईव्हीएमबाबत अनेकदा निवडणूक आयोगाकडे गेलो आहे. निवडणुकीत मशीनचा दुरुपयोग होण्याची शक्यता वारंवार वर्तविली. मात्र आयोगाने त्याकडे लक्ष दिले नाही. जगातील सर्व प्रकारच्या मशीनमध्ये फेरफार करता येऊ शकतो. हे सत्यच आहे. त्यामुळे जगातील कोणताही देश, कोणतीही लोकशाही मतदानासाठी 'ईव्हीएम' सारख्या यंत्रांचा वापर करीत नाही. तर मग आपल्या देशातच का वापर केला जात आहे? 'एक व्यक्ती-एक मत' हे आपल्या लोकशाहीचा पाया आहे. त्यालाच तिलांजली देण्याचे काम होत आहे. देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही सर्व पक्ष प्रयत्न करीत आहोत."

त्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दुजोरा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT