Abdul Sattar News : कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी पंधरा दिवसात जाहिरात..

Satish Chavan : एका कृषी सहाय्यकांकडे १० ते १५ गावांचा कारभार असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
Minister Abdul Sattar News
Minister Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Vidhan Parisad : राज्यातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी पंधरा दिवसात जाहिरात काढली जाईल. तसेच कृषी सहाय्यकाच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी १५ दिवसात संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधान परिषदेत सांगितले.

Minister Abdul Sattar News
Radhakrishna Vikhe Patil News : तुकडा बंदी आदेशावर पंधरा दिवसात निर्णय घेणार..

राज्यातील कृषी सहाय्यकांच्या रिक्त असलेल्या पदासंदर्भात (Marathwada) मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. (Maharashtra Budget) राज्यात कृषी सहाय्यकांची २११५ पदे रिक्त आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचे मुख्य काम तसेच कृषी क्षेत्रातील ४० ते ५० योजनांचे उदिष्ट त्यांना दिलेले असते.

आज एकाएका कृषी सहाय्यकांकडे १० ते १५ गावांचा कारभार असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कृषी सहाय्यकांची रिक्त असलेली पदे त्वरीत भरावीत अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या चर्चेत आमदार राम शिंदे यांनी सहभाग घेत कृषी सहाय्यक या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम करावे अशी मागणी केली.

सदरील प्रश्नाला उत्तर देतांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भरती करण्यात आलेली नव्हती असे सांगितले. तसेच पेसा अंतर्गत राज्यपाल महोदयांनी जे आदेश दिले आहेत तितके सोडून उर्वरित कृषी सहाय्यकांची रिक्त पदे १५ दिवसात जाहिरात काढून भरण्यात येतील, असे सभागृहात सांगितले. तसेच कृषी सहाय्यकांच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी करण्यासाठी १५ दिवसात आपल्यासह संबंधिताची बैठक घेऊन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सभागृहास आश्वस्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com