Karan Bhushan Singh, Brij Bhushan Singh Sarkarnama
देश

Karan Bhushan Singh : खासदार पुत्र व भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील फॉर्च्यूनरने दोन तरूणांना चिरडलं

BJP Leader Convoy : भाजपचे उमेदवार करणभूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने बुधवारी सकाळी दुचाकीला जोरदार धडक दिली. या वाहनामध्ये पोलिस व सुरक्षारक्षक बसले होते.

Rajanand More

Uttar Pradesh Political News : उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार बृजभूषण सिंह यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार करणभूषण सिंह (Karan Bhushan Singh) यांच्या ताफ्यातील वाहनाला बुधवारी सकाळी मोठा अपघात झाला. या वाहनाने तिघांना धडक दिल्यानंतर त्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाल्याने वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त वाहनामध्ये पोलिस बसले होते. (BJP Candidate Convoy)

करनैलगंज-हुजूरपूर मार्गावरील छतईपुरवा येथील वैंकुठ पदवी महाविद्यालयाजवळ बुधवारी हा अपघात झाला. करणभूषण सिंह यांचा वाहनांचा ताफा करनैलगंजहून हुजूरपूरच्या दिशेने निघाला होता. ताफ्यामध्ये सर्वात पुढचे वाहन सिंह यांचे होते. कैसरगंज मतदारसंघातून भाजपने (BJP) यावेळी वडिलांच्या जागी त्यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात २० मेला मतदान झाले आहे. (Latest Political News)

वाहनांचा ताफा वेगात पुढे जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला ताफ्यातील फॉर्च्यूनर वाहनाची जोरदार धडक बसली. या वाहनामध्ये पोलिस (Police) कर्मचारी होते. वाहनाच्या जोरदार धडकेमुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर रस्त्यावरील एक महिलाही जखमी झाली आहे. (Latest Marathi News)

अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. लोकांमध्ये प्रचंड रोष होता. त्यामुळे जवळपास एक तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाहतूक सुरू झाली. वरिष्ठ अधिकाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांचा आक्रोश कमी झाला.

मृत्यूमुखी पडलेले दोन तरूण 20 व 21 वर्षांचे आहेत. हे दोघे निंदूरा गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, पुण्यातील घटनेनंतर वाहनांच्या धडकेच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुण्यातील घटनेची चर्चा देशभर झाल्याने घटनास्थळी नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. (Pune Porsche Car Accident)

उत्तर प्रदेशातील घटनेमध्ये भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहन असल्याने पोलिसांकडून दोषींवर कारवाई होणार की नाही, याबाबतही आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. पुण्यातील घटना दडपण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. त्यावरून दररोज नवीन खुलासेही होत आहेत. त्यामुळे कोणतीही घटना घडल्यानंतर पोलिस आणि प्रशासनाभोवतीही संशयाचे मोहोळ उठू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT