Political Tourism : 300 मोठी हॉटेल्स, 1200 लक्झरी वाहने बुक..! काशीमध्ये बडे नेते, मंत्र्यांचे ‘पॉलिटिकल टुरिझम’

Varanasi Election Update : पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणीसह पुर्वांचलमधील आठ मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात मतदान होणार आहे. 30 जूनपर्यंत या भागात प्रचार सुरू राहणार आहे.
Varanasi Political Tourism
Varanasi Political TourismSarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान एक जूनला होणार आहे. या टप्प्यात सर्वाधिक हायप्रोफाईल मतदारसंघ असलेल्या वाराणसी या मतदारसंघातही मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) हा मतदारसंघ असून त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अजय राय उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे पुर्वांचलमधील इतर सात मतदारसंघातही मतदान होणार असल्याने भाजपसह काँग्रेसचे देशभरातील बडे नेते, मंत्री, पदाधिकारी मागील काही दिवसांपासून काशीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे येथील बहुतेक हॉटेल, वाहने बुक झाली असून पॉलटिकल टुरिझमचे (Political Tourism) चित्र निर्माण झाले आहे.

काशीमध्ये (Kashi) सध्या देशातील बडे नेते तळ ठोकून आहेत. वाराणसीसह लगतच्या आठ मतदारसंघांमध्ये दिवसभर प्रचारसभा, बैठका, रोड शो सुरू आहेत. हे मतदारसंघ हायप्रोफाईल असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदींना वाराणसी मतदारसंघातून विक्रमी मतदान व्हावे, यासाठी भाजपने (BJP) संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. (Latest Political News)

Varanasi Political Tourism
Amit Shah News : गोलमाल सरकार! जगन्नाथ पुरीतील रत्न भांडाराच्या हरवलेल्या चावीने तापवलं राजकारण

अनेक बड्या नेत्यांची काशीमध्ये ये-जा सुरू असल्याने बहुतेक मोठ्या हॉटेलचे जवळपास 500 हून अधिक खोल्यांचे बुकिंग फुल आहे. (Lok Sabha Election Update) खासकरून छावणी क्षेत्रातील हॉटेलला पसंती मिळत आहे. नेत्यांचे प्रतिनिधी व समर्थकांसाठी घाट किनाऱ्यावरील हॉटेल बुक आहेत. मागील दहा दिवसांत मोठी 300 हॉटेलचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. एवढेच नाही तर नेते, कार्यकर्त्यांना ये-जा करण्यासाठी सुमारे 1200 लक्झरी वाहनेही दिमतीला आहेत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

टुरिझम वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मेहता यांनी सांगितले की, प्रचार थांबल्यानंतर लोक हळुहळू जाणे सुरू होईल. मागील दहा दिवसांत हॉटेल व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. सारनाथ, सिगरा, महमूरगंज, शिवपूर, बाबतपूर याशिवाय गंगा किनाऱ्यावरील हॉटेलच्या बहुतेक खोल्या बुक आहेत.

ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या संचालकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील सुमारे 1200 लक्झरी वाहने एक जूनपर्यंत बड्या नेत्यांसाठी बुक आहेत. अनेक वाहने लखनऊ येथून मागविण्यात आली आहे. इतरदिवशी केवळ 100 वाहनांची मागणी असते. पण सध्या त्यामध्ये दसपटीने वाढ झाली आहे. बस, ट्रॅव्हलर्स, लक्झरी कार अशा सर्वच गाड्यांना मागणी आहे. मात्र, त्यामुळे पर्यटकांची अडचण झाली आहे. त्यांना हॉटेल आणि वाहनेही मिळत नसल्याने त्यांचे नियोजन पुढे ढकलावे लागत आहे.

Varanasi Political Tourism
Arvind Kejriwal News : केजरीवालांना लोकसभेचा निकाल जेलमध्येच समजणार; सुप्रीम कोर्टाने दिला दणका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com