Amit Shah News : गोलमाल सरकार! जगन्नाथ पुरीतील रत्न भांडाराच्या हरवलेल्या चावीने तापवलं राजकारण

Lok Sabha Election 2024 : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत जगन्नाथ पुरी मंदिरातील रत्न भांडारावरून राजकारण तापलं आहे. भाजप व काँग्रेसकडून नवीन पटनायक सरकारवर टीका केली जात आहे.
Amit Shah Jagnnath Mandir
Amit Shah, Jagnnath MandirSarkarnama
Published on
Updated on

Odisha Political News : ओडिशातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये जगन्नाथ पुरी (Puri Jagannath Temple) येथील मंदिरातील रत्न भांडाराच्या हरवलेल्या चावीचा मुद्दा गाजत आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah News ) यांनी ओडिशा सरकारला गोलमाल सरकार म्हटले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक सरकारवर शाह यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अखेरच्या टप्प्याआधी शाह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पटनायक (Naveen Patnaik) यांच्यावरही तोंडसुख घेतले. पटनायक यांचे सरकार गोलमाल करत असल्याची टीका त्यांनी केली.

शाह म्हणाले, जगन्नाथ पुरी येथील रत्नभांडाराची चावी रहस्यमयी पध्दतीने हरवली आहे. या प्रकरणाचे रहस्य अजूनही कायम आहे. यातील सत्य समोर यायला हवे. कारण हा श्रध्देचा मुद्दा आहे. (Latest Political News)

Amit Shah Jagnnath Mandir
Arvind Kejriwal News : केजरीवालांना लोकसभेचा निकाल जेलमध्येच समजणार; सुप्रीम कोर्टाने दिला दणका

चावी हरवल्याचे समोर आल्यानंतर त्यावर आयोग नेमण्यात आला. नकली चावी बनवण्याचा मुद्दाही समोर आला. नकली चावी बनवली असेल तर त्याचीही काही माहिती समोर आलेली नाही. रत्नभांडार उघडले की नाही, याबाबत सरकारकडून (Odisha Government) काहीच स्पष्टीकरण आलेले नाही. चौकशी समितीचा अहवाल मागील सात वर्षांपासून पुढे आलेला नाही, असे शाह यांनी सांगितले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रत्न भांडार हा महाप्रभु जगन्नाथ यांच्या जगभरातील भक्तांच्या श्रध्देचा विषय आहे. त्यामुळे श्रध्देच्या मुद्द्यांबाबत रहस्य राहायला नको, अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनीही रत्न भांडाराच्या चावीचा प्रचारात आणला होता. जगन्नाथ मंदिर सुरक्षित नाही. मागील सहा वर्षांपासून चावी हरवली आहे, असे मोदी म्हणाले होते.

काय आहे चावी प्रकरण?

जगन्नाथ मंदिराची उभारणी करण्यात आली, त्यावेळी रत्नभांडारही बनवण्यात आले होते. या भांडारामध्ये सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे सांगितले जाते. राजा-महाराजांच्या काळात मंदिरात अर्पण केलेले हे दागिने आहेत. या दागिन्यांची किंमत अब्जावधी असल्याचे सांगितले जात आहे. भांडारातील बाहेरील भाग उघडा आहे. मात्र, आतील भांडाराची चावी हरवल्याने मागील सहा वर्षांपासून हे भांडार उघडण्यात आलेले नाही. भांडाराच्या बाहेरील भागात वापरातील दागिने ठेवले जातात.

Amit Shah Jagnnath Mandir
Swati Maliwal Assault Case : विभव कुमारांना तीस हजारी कोर्टाकडून आणखी एक दणका ; आता दिला 'हा' निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com