Congress leaders in Karnataka hold discussions with the party high command in Delhi as DK Shivakumar asserts control over all 140 MLAs. The image reflects the growing Karnataka politics tension within the ruling party. Sarkarnama
देश

Karnataka Congress : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा, काँग्रेस नेत्यांनी दिल्ली गाठताच उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, 'माझे 140 आमदार...'

Karnataka Congress Crisis : डी.के. शिवकुमार यांनी अशी पोस्ट केली असली तरी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी 2023 मध्ये झालेल्या सत्ता-वाटप दरम्यान झालेल्या करारावर आधारित असल्याची चर्चा आहे. त्यानुसार सिद्धरामय्या यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पद द्यायचं.

Jagdish Patil

Karnataka Congress Crisis : नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालं. त्यामुळे काँग्रेसने आत्मचिंतन करावं असा सल्ला अनेक राजकीय तज्ञांकडून दिला जात आहे. अशातच आता ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे तिथे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू आहे.

याच अंतर्गत वादातून काही आमदारांनी थेट नवी दिल्लीत गाठल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील काही आमदार दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी संवाद साधण्यासाठी गेले आहेत. हे सर्व आमदार उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारे असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे आता कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलंय. तर या चर्चा सुरू असताना डी.के. शिवकुमार यांनी एक मोठा दावा केला. त्यांनी एक्सवर पोस्ट करत 'सर्व 140 आमदार माझे आहेत' असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

डी.के. शिवकुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, सर्व 140 आमदार माझे आहेत. गटबाजी करणं माझ्या रक्तात नाही. मुख्यमंत्री आणि मी नेहमीच हायकमांडच्या आदेशाचं पालन करतो. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून आता प्रत्येकाला मंत्री व्हायचं आहे.

त्यामुळे ते दिल्लीतील नेतृत्वाला भेटणं स्वाभाविक आहे. आम्ही कोणालाही थांबवू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण त्यांच्यासोबत एकत्र काम करू.'

डी.के. शिवकुमार यांनी अशी पोस्ट केली असली तरी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी 2023 मध्ये झालेल्या सत्ता-वाटप दरम्यान झालेल्या करारावर आधारित असल्याची चर्चा आहे. त्यानुसार सिद्धरामय्या यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पद द्यायचं. मात्र, सध्या अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ सुत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एका वृत्तानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी  मुख्यमंत्री पदावर कायम राहण्याचा आणि पुढील अर्थसंकल्पही सादर करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दिल्लीत गेलेले काँग्रेस आमदार हयकमांडकडे नेमकी काय मागणी करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT