ED raid Congress MLA and Seizes Crores  sarkarnama
देश

Congress MLA : ईडीने कारवाई केलेल्या काँग्रेसच्या आमदाराला 14 दिवसांची कोठडी; नेमकं प्रकरण काय?

Congress MLA K.C. Veerendra Pappi : अंमलबजावणी संचालनालयाने ऑनलाईन बेटिंग आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात चित्रदुर्ग आणि चळ्ळकेरे येथील निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. यावेळी ईडीच्या छाप्यात 12 कोटींची रोकड (एक कोटी परकीय चलनासह), सहा कोटींचे सोन्याचे दागिने, सुमारे 10 किलो चांदी आणि चार वाहने जप्त करण्यात आली होती.

Aslam Shanedivan

Summary :

  1. काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

  2. ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकून १२ कोटी रोकड, एक कोटी परकीय चलनासह जप्त केले.

  3. सहा कोटींचे सोन्याचे दागिने, १० किलो चांदी आणि चार वाहनेही जप्त करण्यात आली.

  4. ईडी कोठडीनंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली.

  5. बेकायदेशीर बेटिंग कंपनी प्रकरणाशी या सर्व कारवाईचा संबंध जोडला गेला आहे.

Bengaluru News : बेटिंग कंपनीच्या कथित बेकायदेशीर कारवायांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आता न्यायालयाने 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सोमवारी (ता.8) बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 22 सप्टेंबरपर्यंत 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली.

50 वर्षीय काँग्रेस आमदार पप्पी यांना 22 ऑगस्ट रोजी सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे अटक करण्यात आली होती. तर त्यांच्या चित्रदुर्ग आणि चळ्ळकेरे येथील निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर केलेल्या कारवाईत ईडीला मोठे घबाड सापडले होते. ज्यात 12 कोटींची रोकड (एक कोटी परकीय चलनासह), सहा कोटींचे सोन्याचे दागिने, सुमारे 10 किलो चांदी आणि चार वाहने जप्त करण्यात आली होती.

ईडीने अटक करण्याआधी त्यांचे घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यावेळी आमदार कॅसिनोसाठी भाडेपट्टा मिळविण्यासाठी गंगटोकला गेले होते. त्यावेळी वीरेंद्र यांचे भाऊ के. सी. नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन. राज यांच्या घरातून मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. याचवेळी त्यांचा दुसरा भाऊ के. सी. तिप्पेस्वामी आणि त्यांचे इतर सहकारी दुबईतून ऑनलाइन गेमिंग ऑपरेशन्स चालवत असल्याचेही उघड झाले.

यानंतरच ईडीने तिसरा छापा पप्पी यांच्या निवासस्थानी टाकला. ज्यात लॉकरमधून मौल्यवान वस्तू असलेल्या दोन कापडी पिशव्या जप्त केल्या. ज्यात ज्यात 12 कोटींची रोकड (एक कोटी परकीय चलनासह), सहा कोटींचे सोन्याचे दागिने, सुमारे 10 किलो चांदी जप्त करण्यात आली होती. तसेच चार महागड्या लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या. हा छापा 2000 कोटींच्या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग रॅकेटच्या चौकशीचा एक भाग होता. सध्या ईडीकडून पप्पी यांच्या 17 बँक खात्यांचीही चौकशी केली जात आहे.

30 हून अधिक ठिकाणी छापे

तब्बल 2000 कोटींच्या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग रॅकेटच्या चौकशीसाठी ईडीकडून 22 ऑगस्ट रोजी चित्रदुर्ग, चळ्ळकेरे, बंगळूर, गोवा आणि जोधपूरसह 30 हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. ज्यात आमदार पप्पी यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानाचाही समावेश आहे.

FAQs :

प्रश्न 1: काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना का अटक झाली?
उत्तर: त्यांना मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर बेटिंग कंपनी प्रकरणात अटक झाली.

प्रश्न 2: ईडीने त्यांच्या घरातून काय जप्त केले?
उत्तर: १२ कोटी रोकड, एक कोटी परकीय चलन, ६ कोटींचे सोन्याचे दागिने, १० किलो चांदी आणि चार गाड्या जप्त केल्या.

प्रश्न 3: न्यायालयाने कोणता निर्णय दिला?
उत्तर: त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली.

प्रश्न 4: ही कारवाई कुठे झाली?
उत्तर: बंगळूर येथील त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला.

प्रश्न 5: या प्रकरणाचा मुख्य संबंध कोणत्या गोष्टीशी आहे?
उत्तर: बेकायदेशीर बेटिंग कंपनीच्या कथित कारवायांशी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT