Congress MLA : 'सेवक आहात मालक नाही, जमत नसेल तर घरी जा'; काँग्रेसचा आमदार एवढा का बरं संतापला!

Shrirampur Congress MLA Hemant Ogle Expresses Displeasure Over Civic Issues in Municipal Meeting : श्रीरामपूर नगरपरिषदेतील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आमदार हेमंत ओगले यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट हल्ला चढवला.
Congress MLA Hemant
Congress MLA Hemant Sarkarnama
Published on
Updated on

Shrirampur civic issues : सरकारीच्या खुर्चीवर बसलात, पण ती तुमची नाही. लोकसेवेचे भान ठेवा. सेवक आहात मालक नाही, प्रश्न सोडवायचे नसतील तर घरी जा, अशा शब्दांत काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना जळजळीत सुनावले.

श्रीरामपूर नगरपरिषदेतील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट हल्ला चढवला.

मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह सर्व विभागप्रमुखांसमोर काँग्रेस (Congress) आमदार ओगले यांनी लेखी तक्रारींचा ढीग माझ्याकडे जमा आहे. पण कारवाई कुठेच दिसत नाही. हा कारभार थांबवला नाही, तर मीच टोकाचं पाऊल उचलतो, असा स्पष्ट इशारा दिला.

माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी देखील अधिकारी सोडवू शकत नाही. श्रीरामपूर (Shrirampur) शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाणीपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. परंतु, प्रशासनातल्या काही उदासीन अधिकाऱ्यांमुळे सर्वच प्रशासन बदनाम होताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत आपण आपल्या कामात सुधारणा करावी, अशी सर्वांची माफक अपेक्षा आहे.

Congress MLA Hemant
Mumbai railway accidents : दररोज दहा मृत्यू, स्थिती चिंताजनक; उच्च न्यायालयाचे मुंबई रेल्वे प्रशासनावर ताशेरे

जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी शिवाजी रस्ता, संगमनेर रस्त्यावरील बँकांना ना-हरकत देताना पार्किंगचं भान होतं का? चौक सुशोभिकरण केवळ नावापुरतं आहे का? वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतोय, त्याचं काय? पार्किंगसाठी ‘सम-विषम’ पद्धती राबवावी, अशी सूचना करून सध्या चालू असलेले चौक सुशोभिकरणाचे काम हे चुकीच्या पद्धतीने चालू असून वाहतुकीचे नियोजन कसे करणार, स्मारके, चौक सुशोभिकरण यापेक्षाही चांगल्या जागी केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून नागरिकांना देखील त्रासाला सामोरे जावा लागणार नसल्याचे सांगितले.

Congress MLA Hemant
Bachchu Kadu Amravati protest : बच्चू कडूंचा 'प्रहार'; सरकार लागलं कामाला

तीन तास चाललेल्या बैठकीत नागरिकांनी थेट प्रश्‍नांची सरबत्ती केली. प्रशासनाचे प्रतिनिधी उत्तरं द्यायला कचरत असल्याचं चित्र वारंवार दिसलं. या बैठकीला माजी सभापती बाबासाहेब दिघे, सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, अण्णासाहेब डावखर, प्रमोद भोसले, राजेंद्र सोनवणे, तसेच शहरातील अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

स्मारकासाठी 50 लाखांची घोषणा

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी शहरात जागा उपलब्ध करून द्या, असं सांगत आमदार निधीतून 50 लाखांचा निधी देणार असल्याचं काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com