Political circles in Karnataka; Siddaramaiah and D. K. Shivakumar Sarkarnama
देश

Congress News : काँग्रेसमध्ये खळबळ, नवे सरकार येण्याआधीच मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा; सिध्दरामय्यांच्या तब्बल 20 मंत्र्यांना स्थान नाही?

Karnataka congress cabinet reshuffle latest news : कर्नाटकातील काँग्रेस वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू असून विद्यमान २० मंत्र्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

Aslam Shanedivan

Karnataka Congress cabinet formation news : कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून सिद्धरामय्या यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागणार असून त्यांचा शपथविधी ३ जून रोजी होणार आहे.

दरम्यान शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटकात सुरू असलेला सत्तेसाठीचा तीव्र संघर्ष आता थांबल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेदरम्यान विद्यमान २० मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान गमवावे लागू शकते, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

कर्नाटकातील काँग्रेस वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान मंत्रिमंडळातील तब्बल १७ ते २० मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान गमवावे लागू शकते, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या मंत्रिमंडळात केवळ १० ते १२ वरिष्ठ मंत्र्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित मंत्र्यांना काँग्रेस हायकमांडकडून डच्चू मिळू शकतो. विशेषतः बंगळूर विभागातील तीन प्रभावशाली मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, आपल्या निकटवर्तीय नेत्यांना मंत्रिपद गमवावे लागू नये, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सतर्क झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या समर्थक गटातील किमान ६ ते ७ आमदारांना नव्या मंत्रिमंडळात अनिवार्यपणे स्थान द्यावे, असा आग्रह त्यांनी काँग्रेस हायकमांडसमोर धरल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी मंत्रिमंडळाची रचना केवळ राजकीय प्रभावावर नव्हे, तर तीन महत्त्वाच्या सूत्रांवर आधारित असणार असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सिद्धरामय्या समर्थक गट, शिवकुमार यांचे निकटवर्तीय आणि हायकमांडच्या पसंतीचे नेते या तीन गटांतून मंत्र्यांची निवड केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेस हायकमांडकडून थेट सुमारे २० नेत्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि युवा नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी यावेळी ‘नव्या चेहऱ्यां’ना अधिक प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘सेफ कार्ड’ मिळण्याची शक्यता असलेले नेते

अनेक मंत्र्यांची पदे जाणार; मात्र काही वरिष्ठ आणि कार्यक्षम मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये के. जे. जॉर्ज, प्रियांक खर्गे, एम. बी. पाटील, कृष्णा बैरेगौडा, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोळी, ईश्वर खंड्रे किंवा शरणप्रकाश पाटील, डॉ. जी. परमेश्वर, शिवराज तंगडगी, के. एच. मुनियप्पा, मंकाळ वैद्य आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT