Congress Politics : काँग्रेसचा मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत! राहुल गांधींनी बैठक घेतली अन्...

Karnataka Congress Crisis CM Siddaramaiah DK Shivakumar : दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत नेतृत्वबदलाबाबत चर्चा झाली असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे.
Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash over chief ministerial ambitions
Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash over chief ministerial ambitionsSarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या दोन दिवसात राजीनामा देणार आहेत. शुक्रवारी ते राजीनामा देतील, असे खात्रीलायक सुत्रांनी सांगितल्याचे वृत्त मराठी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यात अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते. मात्र, अडीच वर्षानंतर देखील सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रि‍पदी कायम राहावे म्हणून त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न केले जात आहेत.

77 वर्षीय सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे, यासाठी काँग्रेसमधून त्यांच्यावर दबाव आहे. ठरलेल्या फाॅर्मुल्यानुसार उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. याबाबत काँग्रेसकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, शिवकुमार हे पुढील मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले आहे.

मंगळवारी दिल्लीत वेगवान घडामोडी घडल्या. राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीला सिद्धरामय्या, डी के शिवकुमार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, के सी वेणूगोपाल उपस्थित होते. ही बैठक राज्यसभा आणि विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेतृत्वबदला बाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी नेतृत्वबदल ही केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे.

Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash over chief ministerial ambitions
Karnataka CM row : डी. के. शिवकुमार यांचा 3-4 महिन्यांपूर्वीच राजीनामा! काँग्रेसमधील बड्या नेत्याचा बॉम्ब, पक्षात खळबळ

सिद्धरमय्या राज्यसभेवर जाणार?

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर जाण्याची ऑफर देण्यात आली आहे. दिल्लीत संघटनेमध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहेत. सिद्धरामय्या यांच्या समर्थकांकडून मात्र विधानसभेची मुदत संपेपर्यंत त्यांनी मुख्यमंत्रि‍पदी कायम राहिले पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पेच आणखी वाढल्याची माहिती आहे.

Tensions rise as Karnataka Congress leaders Siddaramaiah and Shivakumar clash over chief ministerial ambitions
Congress Crisis : काँग्रेस आमदाराने मुख्यमंत्री बदलाचा बॉम्ब फोडत ‘फायनल डेट’च जाहीर केली; खर्गे यांनीही स्पष्टच सांगितले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com