Sharad Pawar, NCP News Sarkarnama
देश

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा ; कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत आयोगाने घड्याळ...

Karnataka Election 2023 NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election 2023 NCP News : केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का देत पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला आहे.

राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणूक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष होतं, या परिस्थिती आता राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला परवानगी दिली आहे. याबाबतची विनंती पक्षाने आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाचा परवानगीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटक निवडणुकीत मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबत निवडणूक आयोगानं गेल्या महिन्यात नोटीस पाठवली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आयोगासमोर बाजू मांडली होती. या बैठकीतनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रीय दर्जा कायम राहणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता. मात्र, निवडणूक आयोगानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जाच रद्द केला आहे.

  • 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता.

  • राष्ट्रवादीला 2014 नंतरच्या कामगिरीमुळे तो धोक्यात आला होता.

  • 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात राष्ट्रवादीने निवडणुक लढवली होती.

  • नागालँडचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन सुद्धा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकत नाही हे ऑर्डर मध्ये नमूद केलं आहे.

  • राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात.

  • या निकषांची पूर्तता न केल्यामुळे निवडणुक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे.

    (Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT