Karnataka Election : Sarkarnama
देश

Karnataka Election : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; भाजप-जेडीएसच्या ३ बंडखोरांसहित ४२ जणांना उमेदवारी !

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 42 उमेदवारांना पक्षाचे तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजप आणि जेडीएसमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या ३ उमेदवारांनाही तिकीट दिले आहे.

काँग्रेसच्या या यादीत भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार गोपालकृष्ण, मोलकलमुरू यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपमधून बाहेर पडलेले माजी आमदार बाबुराव चिंचनसूर, गुरुमितकल आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आणखी एका आमदाराला तिकीट देण्यात आले आहे. यासोबतच जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार श्रीनिवास यांना गुब्बीमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे.

यापूर्वी 25 मार्च रोजी कर्नाटक (Karnataka) काँग्रेसने 124 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यातच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार कनकपुरा येथून निवडणूक लढवणार असल्याचे या यादीत सांगण्यात आले. याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांकही या यादीत आहे. ते चितापूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

या यादीत एम.बी.पाटील यांना बाबलेश्वरमधून, दिनेश गुंडूराव यांना गांधीनगरमधून, आमदार पुत्तण्णा यांना राजाजीनगरमधून आणि माजी केंद्रीय मंत्री केएच मुनियप्पा यांना देवनहल्लीतून उमेदवारी बहाल झाली आहे. याशिवाय मंगलोरमधून यूटी अब्दुल खादर अली फरीद, शृंगेरीमधून टीडी राजगौडा, शिवाजी नगरमधून रिझवान इर्शाद, विजय नगरमधून एम कृष्णमप्पा आणि बेल्लारी आरक्षित जागेवरून बी नागेंद्र यांना तिकीट देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT