Karnataka election 2023
Karnataka election 2023  Sarkarnama
देश

Karnataka Elections 2023 : कर्नाटकमध्ये पहिल्याच दिवशी २२१ जणांचे अर्ज ; भाजप २७, काँग्रेसकडून...

सरकारनामा ब्यूरो

First Day of Nomination Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी आहे. यासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी २२१ जणांची आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

काल (गुरुवार) अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता. यावेळी विविध मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यात आले. गुरुवारी १९७ पुरुष, २४ महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

यात भाजप २७, काँग्रेस २६, आम आदमी पार्टी १०, बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) १, जनता दल (सेक्युलर) १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तर अन्य १००, तर अपक्ष ४५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

काँग्रेस, भाजप आणि जेडी (एस) यांनी आपल्या उमेदवारांना एबी फार्म दिले आहेत. आपले नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल आहे. भाजप, काँग्रेस यांनी आपल्या दोन उमेदवारी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण ५१ लिंगायत समाजाच्या नेत्यांना तिकीट दिले आहे. २०१८ साली भाजपाने ५५ जागांवर लिंगायत समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिले होते. ही निवडणूक लिंगायत समाजाचे नेते बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वात लढण्यात आली होती.

भाजपाच्या पहिल्या यादीत येडियुरप्पा यांच्या १२ कट्टर समर्थकांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय युजवेंद्र यांच्यासह काँग्रेस आणि जेडीएसकडून प्रलोभन देण्यात आलेल्या १४ लोकांनाही (यामध्ये १२ आमदारांचा समावेश आहे.) भाजपाने यावेळी तिकीट दिले आहे. (Latest Maharashtra News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT