Summons To Arvind Kejriwal: मुख्यमंत्र्यांना गोवा पोलिसांची नोटीस, २७ एप्रिलला हजर राहण्याचा आदेश

Goa Police Summons CM Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाला गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय पटकावला आहे.
Arvind Kejriwal Latest News
Arvind Kejriwal Latest News Sarkarnama

Goa Police Summons CM Arvind Kejriwal : सरकारी जागेवर अवैध प्रकारे निवडणुकीचे फलक लावण्याच्या कारणावरुन मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांना २७ एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

गोवा पोलिसांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. गोव्याचे पेरनेम पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कुमार हलर्नकर यांनीही नोटिस बजावली आहे. आम आदमी पक्षाला गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय पटकावला आहे.

Arvind Kejriwal Latest News
Changes In NCERT Book : देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्यांचा संदर्भ NCERT ने हटवला ..

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्ली येथे भेट घेतली.

या भेटीवर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी जोरदार टीका केली आहे. केजरीवाल हे भारतीय राजकारणातले नटवरलाल आणि पिनाचिओ (कार्टून पात्र) असल्याचे ते म्हणाले.

Arvind Kejriwal Latest News
Sharad Pawar Reaction: अजितदादा भाजपमध्ये जाणार ? दमानियांच्या टि्वटवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया..म्हणाले..

केजरीवाल यांनी गतकाळात लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात केलेले ट्विट्स आपल्या पत्रकार परिषदेत पुनावाला यांनी दाखविले. “केजरीवाल यांनी आतापर्यंत अनेकवेळा वैचारीक यु-टर्न घेतलेला आहे. (Latest Political News)

सुरुवातीच्या काळात त्यांनी अण्णा हजारेंना पाठिंबा दिला होता. आता एकेकाळी ज्यांच्याविरोधात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यांच्याशीच हातमिळवणी केली आहे.” असा आरोप शेहनाज पुनावाला यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com