Karnataka corruption news : भाजप आमदाराने रस्त्याच्या कडेला तटबंदी बांधकामाच्या सुमारे एक कोटीच्या कामासाठी श्रेणी एक कंत्राटदाराकडे ११ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यात पाच लाख रुपये घेताना भाजप आमदाराला पकडण्यात आलं आहे. लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
भाजपने देशात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसविरोधात भ्रष्टाचाराचे रान उठवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "ना खाऊगा, ना खाणे दुंगा", अशी घोषणा केली होती. ही घोषणा प्रसिद्धीस आली पण, भाजपच्या शिस्तीचा, भ्रष्टाचाराचा या आमदारामुळे बुरखा फाटला.
कर्नाटक राज्यातील गदग जिल्ह्यातील शिरहट्टी मतदारसंघातील भाजप (BJP) आमदार डॉ. चंद्रू लमाणी याला पाच लाखांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्याचे दोन स्वीय सहाय्यकानांही कारवाई करत ताब्यात घेण्यात आले.
धारवाड लोकायुक्त विभागाचे पोलिस (Police) अधीक्षक सिद्धलिंगाप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आमदार लमाणी हे स्वत: डॉक्टर आहेत. कारवाईदरम्यान आमदारांसह त्यांचे सरकारी स्वीय साहाय्यक मंजुनाथ वाल्मिकी आणि खासगी स्वीय साहाय्यक गुरू लमाणी या दोघांना अटक करण्यात आली.
रस्त्याच्या कडेला तटबंदी बांधकामाच्या सुमारे एक कोटीच्या कामासाठी श्रेणी-1 कंत्राटदार विजय पुजार यांच्याकडून आमदारांनी 11 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना लोकायुक्त पथकाने छापा टाकून तिघांना पकडले.
आमदार आणि दोन्ही स्वीय साहाय्यकांना चौकशीसाठी लोकायुक्त कार्यालयात नेण्यात आले होते. या प्रकरणामुळे जिल्ह्याबरोबरच राज्यात आणि भाजपमध्ये खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू आहे.
आमदारांसह खासगी सहाय्यक (PA) मंजूनाथ वाल्मिकी आणि गुरुनायक या तिघांकडे कसून चौकशी सुरू असून प्रकरणातील सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. लोकायुक्त पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोकायुक्तच्या अधिकृत निवेदनानुसार, लाच मागणी व स्वीकार यासंबंधी सर्व पुरावे तपासले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.