NCP leader rape case : अभिषेक कळमकर याचा काळा कारनामा; मोठ्या ताईंची शांतता की समर्थन? चित्रा वाघांचा सडेतोड हल्ला

Ahilyanagar: BJP MLA Chitra Wagh Demands Action from Supriya Sule in Abhishek Kalamkar Rape Case : अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर अभिषेक कळमकरांविरोधात भाजप आमदार चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत.
NCP leader rape case
NCP leader rape caseSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar rape case : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याने 25 वर्षीय युवतीला नोकरीचे अमिष दाखवून, तिच्यावर अत्याचाराच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात भाजप आक्रमक झाली आहे.

विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत, थेट शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत, 'महिलांच्या सुरक्षेवर राजकारण नाहीच… पण राजकीय संरक्षण खपवून घेणार नाही,' असा इशारा दिला आहे.

भाजप (BJP) आमदार चित्रा वाघा यांनी, 'समाज माध्यमांवरील खात्यावर पोस्ट शेअर करताना, महिलांच्या सुरक्षेवर राजकारण नाहीच. पण राजकीय संरक्षण खपवून घेणार नाही. अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर असलेल्या अभिषेक कळमकरने जे काळं कृत्य केलं त्याला माफी नाही. त्याला कायद्यानुसार शिक्षा होईलच,' असा घणाघात केला आहे.

चित्रा वाघ यांनी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर देखील यानिमित्ताने निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटल्या आहे की, पण आज माझा थेट प्रश्न बारामतीच्या मोठ्या ताईंना आहे. महिलांच्या सन्मानावर मोठमोठी भाषणं करणाऱ्या आज गप्प का? त्या नराधमाला तुमच्या पक्षातून तात्काळ बडतर्फ करणार नाही का? लक्षात ठेवा, मौन हे देखील सहकार्यासारखंच असतं, असं म्हटलं आहे. हा फक्त एका मुलीचा प्रश्न नाही. हा महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

NCP leader rape case
Sangamner news : “पाणी द्या” म्हणणं पडलं महागात! युवकाला लगावली कानाखाली! बाजार समिती संचालकाचा कारनामा, प्रकरण थेट पोलिसांत

दरम्यान, अभिषेक कळमकर याच्या शोधासाठी अहिल्यानगर पोलिसांनी कंबर कसली आहे. अभिषेक कळमकर याचे आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. मात्र गुन्हा दाखल होताच अभिषेक कळमकर हा पसार झाला असून याबाबतचा तपास आता तोफखाना पोलिस करत आहेत.

NCP leader rape case
Ajit Pawar Plane Accident : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपाताचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

अभिषेक कळमकर याच्या शोधासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली असून, त्याच्या मागाव रवाना झाली आहेत. लवकरच आरोपीला अटक होईल, असा विश्वास तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक जगदीश भांबळ यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com