Gram panchayat Election Sarkarnama
देश

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेर! निवडणूक प्रक्रियाही लवकरच सुरू

karnataka gram panchayat elections 2026 : कर्नाटक राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत ग्रामीण विकास व पंचायत राजमंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली आहे.

Aslam Shanedivan

  1. कर्नाटकातील ग्रामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेरपर्यंत घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली.

  2. प्रभाग निश्‍चितीवरील हरकतींची मुदत संपली असून निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

  3. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पडणार आहेत.

karnataka priyank kharge news : कर्नाटक राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेरपर्यंत घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण विकास व पंचायत राजमंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली. ग्रामपंचायतींच्या प्रभाग निश्‍चितीबाबत हरकती नोंदविण्याची मुदत आठ मे रोजी संपली असून, निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यानंतर तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकाही टप्प्याटप्प्याने होतील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गुलबर्गा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत बोलताना खर्गे म्हणाले की, पाणीपुरवठ्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. पाणीटंचाईग्रस्त २१ गावांमध्ये नवीन कूपनलिका खोदण्यात आल्या असून, चार गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही प्रियांक खर्गे यांनी सांगितले.

याशिवाय, कल्याण कर्नाटक प्रादेशिक विकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांना १७.३० कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून, या समितीच्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याच्या कामांना गती दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार एम. वाय. पाटील आणि बी. आर. पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेण्यात आली. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि पक्षश्रेष्ठी योग्यवेळी निर्णय घेतील, असे प्रियांक खर्गे यांनी स्पष्ट केले.

FAQs :

1. कर्नाटकात ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार आहेत?

प्रियांक खर्गे यांच्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

2. प्रभाग निश्‍चिती प्रक्रिया पूर्ण झाली आहे का?

होय, प्रभाग निश्‍चितीवरील हरकती नोंदविण्याची मुदत ८ मे रोजी संपली आहे.

3. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर कोणत्या निवडणुका होणार आहेत?

तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत.

4. निवडणूक प्रक्रिया कधी सुरू होणार?

सरकारच्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.

5. या घोषणेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?

ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून विविध पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT