Gram Panchayat Employees : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय, फक्त 45 दिवसांत कारवाई...

BDO Gram Panchayat Goverment GR: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीबाबत कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे,
maharashtra gram panchayat
maharashtra gram panchayatsarkarnama
Published on
Updated on

Goverment GR : ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाची चर्चा होत आहे. गेल्या वर्षी सरकारने जीआर काढत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत विशिष्ट दिवसांची मर्यादा निश्चित केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर लेखी आदेशाद्वारे दंड करता येईल, निलंबित करता येईल किंवा बडतर्फ करता येईल. या कारवाईच्या विरोधात कर्मचारी गट विकास अधिकाऱ्यांकडे अपिल करू शकतात.

यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांना या अपिलावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नव्हती. त्यामुळे अनेकदा बडतर्फ कर्मचारी यांना संरक्षण मिळत असल्याची टीका होत होती. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांनी केलेल्या अपिलावर निर्णय घेण्याबाबत कालमर्यादा निश्चित केली आहे. पंचायतीच्या कर्मचाऱ्यांला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय अशा कोणत्याही अपिलाचा किंवा अर्जाचा निर्णय केला जाणार नाही अशी तरतूद होती.

गट विकास अधिकारी यांना 45 दिवसांच्याआधी अपिलावर निर्णय घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा अपिलात गट विकास अधिकाऱ्यांने दिलेल्या निर्णयाविरुध्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पुनरीक्षणासाठी अर्ज करता येईल. परंतु, असा कोणताही अर्ज निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीच्या आत केला नाही तर, तो अर्ज दाखल करुन घेतला जाणार नाही.

maharashtra gram panchayat
CM Vijay news : मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार हाती घेताच विजय यांचे 4 धडाकेबाज निर्णय; राहुल गांधींसमोरच स्टॅलिन यांना दिला पहिला झटका

नवीन जीआरनुसार पंचायतीने नेमणूक केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला लेखी आदेशाद्वारे दंड, निलंबित किंवा बडतर्फ केल्यानंतर गट विकास अधिकारी यांच्याकडे विहित मुदतीत अपील दाखल झाल्यानंतर, गट विकास अधिकारी यांनी ते अपील प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाली काढावे. तसेच गट विकास अधिकारी यांच्या निर्णयाविरुध्द मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांच्याकडे विहित मुदतीत पुनरिक्षणासाठी अर्ज दाखल झाल्यास, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर पुनरीक्षण अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसाच्या आत निकाली काढावे लागणार आहे .

maharashtra gram panchayat
Vikas Lavande Ink Attack : शाईफेक प्रकरण तापले; विकास लवांडेंसाठी शरद पवारांचा थेट पोलीस महासंचालकांना फोन, CM फडणवीसांनाही भेटणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com